February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

हाॅटेल चालु ठेवले,पांगरी पोलीसात एकावर गुन्हा…वाचा


बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी आपल्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना चिंचोली ता.बार्शी फाट्यावर हाॅटेल चालु ठेऊन कोरोणा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हाॅटेल चालकाविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
#अमजद काशीम शेख राहणार पांगरी ता बार्शी असे याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हाॅटेल चालकाचे नाव आहे.

#अर्जुन  कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 3/ 4/ 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास  अमजत  शेख वय 36 वर्षे  यांनी हाॅटेल उघडे ठेवले. सोलापूर जिल्ह्यामध्ये करोना विषाणूचा संसर्ग रोखणे करिता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत .त्या अनुषंगाने दर शनिवार रविवार या दिवशी सर्व हॉटेल व दुकाने बंद राहतील असे कायदेशीर केलेले असताना आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावता हॉटेल न्यू दरबार हे चालू ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग  पसरविण्याची घातक कृत्य करून शासनाने व  जिल्हाधिकारी  सोलापूर यांचे आदेश उल्लंघन केले आहे .तपास डाके हे करत आहेत.

Leave a Reply