March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

हातावर पोट असलेल्या मजुरांचे व दुकानदारांचा किमान घर भाडे दुकान भाडे याचा तरी वीचार सरकारने करावा :  सुमित पंडित

औरंगाबाद;
30 मार्च पासून 8 मार्चपर्यंत लागणा-या लॉकडाऊनला समाजसेवक सुमित पंडित माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे विरोध केला आहे. शहर जिल्ह्यात वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही.हातावर पोट असलेल्या मजुरांचे व दुकानदारांचा किमान घर भाडे दुकान भाडे याचा तरी वीचार सरकारने करावा अगोदरच लॉकडाऊन म्हटले की अंगावर शहारे येतात. मागील अनुभव आमच्या सोबत आहे.आर्थिक परिस्थिती सामान्य नागरिकांची बिकट आहे. छोटे मोठे उद्योग संकटात आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय जनतेला विश्वासात घेऊन घेतला नाही अगोदर गरीबांच्या जेवनाची व्यवस्था प्रशासनाने करायला हवे. धार्मिक स्थळ बंद करण्याचा निर्णयाने सर्व समाजात नाराजी आहे. उद्या जिल्हाधिकारी यांची भेट घेवून चर्चा करणार आहे. जनतेचे विचार मी जाणून घेतले त्यानंतर प्रसार माध्यमांना हि माहिती देत आहे. लॉकडाऊन लावल्यास जनतेचे हाल होतील याकडे प्रशासनाने बघायला हवे. जनता रस्त्यावर उतरुन विरोध करतील यामुळे प्रशासनाने निर्णय बदलायला हवा अशी मागणी आम्ही करणार आहे.अशी माहिती माणुसकी समुहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी माध्यमांना दिली आहे.अंशतः लॉकडाऊन, शनिवार व रविवारी लावलेल्या लॉकडाऊनला विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply