March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

हरवलेला फोन कसा शोधाल?

नवी दिल्ली, 21 मार्च : सध्या स्मार्टफोन प्रत्येकासाठीच महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आयफोन असो किंवा इतर कोणताही अँड्रॉईड स्मार्टफोन असो, फोन हरवणं ही सगळ्यांसाठीच मनाला लागणारी बाब ठरते. स्मार्टफोन म्हणजे केवळ फोटो, व्हिडीओ, गाणी ठेवण्यासाठीचं माध्यम नसून अनेक महत्त्वाची खासगी माहितीही स्मार्टफोनमध्ये स्टोर केलेली असते. अनेक सोशल मीडिया अकाउंट्सचं लॉगइन, बँक अकाउंट्सचंही लॉगइन अनेकांच्या फोनमध्ये सेव्ह असतं. त्यामुळे अशात स्मार्टफोन हरवणं ही मोठी चिंतेची बाब ठरु शकते. परंतु एक पर्याय आहे, ज्याद्वारे हरवलेला अँड्रॉईड स्मार्टफोन शोधून त्याचं लोकेशन समजू शकतं. त्याशिवाय गरज पडल्यास फोनमधील डेटाही हटवता येऊ शकतो.

Advertisement

गुगलद्वारे युजर्स आपला अँड्रॉईड फोन शोधून त्यातील डेटा इतर कोणाच्या हाती लागू नये यासाठी तो डिलीटही करू शकतात. Find My Device या फीचरद्वारे फोन शोधता येऊ शकतो. यासाठी हरवलेला फोन ऑन असणं आवश्यक आहे. फोन मोबाईल डेटा किंवा वायफायशी कनेक्ट असावा.

Android साठी या स्टेप्स फॉलो करा –

– सर्वात आधी android.com/find वर जावं लागेल आणि आपल्या गुगल अकाउंटमध्ये साईन-इन करा.

– फोनमध्ये एकाहून अधिक युजर प्रोफाईल असतील, तर गुगल अकाउंटसह जे मेन प्रोफाईलवर असेल, त्यावर साईन-इन करावं लागेल. हरवलेल्या फोनवर एक नोटिफिकेशन येईल.

– गुगल मॅपवर फोन कुठे आहे याची माहिती मिळेल. लोकेशनद्वारे फोन कुठे आहे, याची माहिती मिळेल.

– जर फोन मिळाला नाही, तर शेवटचं लोकेशन दिसेल.

फोनचं लोकेशन मिळाल्यानंतर तीन पर्याय येतील –

प्ले साउंड – तुमचा फोन पाच मिनिटांपर्यंत फुल वॉल्युमवर रिंग करू शकता, तो सायलेंट, व्हायब्रेटवर असेल तरीही करता येईल.

सिक्योर डिव्हाईस – तुमचा फोन पिन, पॅटर्न किंवा पासवर्डने लॉक करा, जर लॉक नसेल, तर तुम्ही सेट करू शकता.

इरेस डिव्हाईस – यात तुमच्या फोनमध्ये असणारा सर्व डेटा तात्पुरता डिलीट होईल. (परंतु SD कार्डचा डेटा राहू शकतो) त्यानंतर Find My Device फीचर काम करणार नाही.

कसा ट्रॅक कराल हरवलेला iPhone?

– यासाठई फाइंड माय आयफोनचा वापर करता येतो.

– त्याशिवाय हरवलेल्या iPhone ला Apple च्या फॅमिली शेअरिंगच्या माध्यमातूनही ट्रॅक करता येऊ शकतं.

– फोन शोधण्यासाठी गुगल टाईमलाईन, गुगल फोटोचाही वापर करता येतो.

फाइंड माय आयफोनचा वापर कसा कराल?

– फोनमध्ये फाइंड माय आयफोन इनबिल्ट असल्यास, मोबाईल फोनला लोकेट करा.

– आपल्या iPhone चा डेटा सुरक्षित ठेवा, त्यासाठी लॉस्ट मोड किंवा इरेजिंग डेटा रिमोटलीचा वापर करा.

कसा शोधाल iPhone?

– यासाठी कंप्युटरवर icloud.com वर क्लिक करा. त्यानंतर साईन-इन करावं लागेल.

– त्यानंतर फाइंड माय आयफोनवर लिंकवर क्लिक करा.

– यानंतर फाइंड माय आयफोन मॅपच्या इंटरफेसमध्ये याल, येथे ड्राप डाउन मेन्यूमध्ये जावून आपल्या लॉस्ट iPhone वर क्लिक करा. त्यानंतर फोनच्या लोकेशनची माहिती मिळेल.

कसा डिलिट कराला iPhone चा डेटा?

– यासाठी इरेस आयफोनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आयफोन डेटा रिमोटली डिलिट करू शकता. परंतु डेटा डिलिट करण्यापूर्वी महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ, गाणी आणि इतर महत्त्वाचा डेटा कॉपी करुन घ्या, जेणेकरुन एकदा डिलिट झालेला डेटा पुन्हा मिळू शकेल.

Leave a Reply