December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

स्व. अंकुल (गोलु) चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमीत्त बार्शीत रक्तदान शिबिर

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
स्व. अंकुल (गोलु) चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमीत्त रक्तदानण शिबीराचे स्व. अंकुल (गोलु) चव्हण मित्र मंडळ , बार्शी यांच्या वतिने आयोजन करन्यात आले होते , त्या वेळी शिबिराचे उद्घाटन नाना गव्हाणे यांच्या हस्ते झाले या वेळी झालेल्या रक्तदान शिबिरास माजी मंत्री दिलीप सोपल यांनी भेट दिली या वेळी त्यांनी अंकुल चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मृती बाबत बोलताना अंकुल यांच्या आठवणी जागृत केल्या. या बोलताना सोपल म्हणाले की , अंकुल हा सर्व सामान्य घरातुन पुढे आलेला एक सच्चा कार्यकर्त्या आणि समाजभान असणारा युवक होता. त्याच्या नंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांनीही अंकुल च्या आठवणी जागृत राहाव्यात या साठी रक्तदान शिबिर सारखे उपक्रम राबवत उत्तम कार्य केले आहे. या पार पडलेल्या रक्तदान शिबीरात २५१ जनांनी रक्तदान करून अंकुल (गोलु ) वरील प्रेम दाखवुन दिले,
या शिबीरास माजी मंत्री . दिलीप सोपल, युवा नेर्तेुत्व आभिजीत ( भैय्या ) राऊत , सुरज (भैय्या )डिसले, रामभाई शहा ब्लड बँकेचे अध्यक्ष अजित कुंकलोळ , माजी उप.नगराध्यक्ष आबाजी पवार, मंगलताई शेळवने, , कालभैरव पतसंस्थेचे चेअरमन देविदास बापु बारंगुळे, तानाजी डिडवळ , पांडुरंग गव्हाणे , व आजी माजी नगरसेवक तसेच आनेक मान्यवर उपस्थीत होते.
तसेच महिलांनी देखील रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी त्यांच्या जिवलग मित्र यांनी परिश्रम घेतले. तसेच रक्तदान समारंभाची सांगता रेड क्रॉस सोसायटी चेअरमन अजितदादा कुंकूलोळ यांनी स्वर्गीय अंकुल गोलू चव्हाण मित्र मंडळाचे व रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिरा साठी मार्गदर्शन लहूजी चव्हाण , रितेश वाघमारे,नागजी कातुरे ,विजय दळवे आदीचे लाभले. तर आभार बाळासाहेब गव्हाणे यांनी मानले.

Leave a Reply