स्वामिनी संस्था अंतर्गत कै.भगवानदादा पवार वाचनालयाचा भोयरेत शुभारंभ

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
भोयरे ता. बार्शी येथील स्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत कै. भगवानदादा पवार वाचनालयाचा शुभारंभ आज ऑल जर्नालिस्ट & फ्रेंड सर्कलचे केंद्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश गोडसे यांच्या हस्ते पार पडला.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एल्गार कामगार संघटनेच्या बार्शी शहरध्यक्षा रेखा कदम, संपादक संघाचे अध्यक्ष योगेश लोखंडे, जिजाऊ टाईम च्या संपादिका संगीता पवार, कुतुहूल चे संपादक ईरशाद शेख,अजित थिटे, सूर्यकांत पवार, गणेश पवार ,गोविंद पवार, बार्शी शहर बुरुड समाज अध्यक्ष हनुमंत पवार हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जागतीक घडामोडी पोचाव्या ,पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी तसेच इतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तक उपलब्ध करून दैनिक वर्तमानपत्र वाचनालयात दैनंदिन असणार असे स्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक विक्रांत पवार यांनी सांगितले.