स्नेहग्राम निवासी शाळेच्या निर्मितीला प्रिसीजनच्या मदतीचा हात…!!

बार्शी :
कोरफळे (ता. बार्शी) येथील अजित फाउंडेशन संचलित ‘स्नेहग्राम’ या प्रकल्पात ‘प्रिसिजन’ समूहाच्या सीएसआर निधीतून निवासी शाळेची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते आज म्हणजे गुरुवारी (दि. ४ मार्च) पार पडला.डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन व प्रकल्पाचा सविस्तर आराखडा असणाऱ्या फलकाचेही अनावरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहालयचे संस्थापक श्री. गिरीश कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार श्री. राजा माने, शांतीवनचे श्री. दिपक नागरगोजे, श्री. माधव देशपांडे, श्री. आदित्य गाडगीळ, स्नेहा सपकाळ, श्री. दत्ता बारगजे, श्री. आनंद सोमाणी, श्री. अमित इंगोले, श्री. कौरव माने (मा. जि.प. उपाध्यक्ष), उपसरपंच सौ. मुद्रुका संसारे, श्री. रामभाऊ संसारे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. गौतम जगताप, श्री. विनायक घोडके, श्री. शंकर पाटील श्री. रवि होनराव (पोलीस पाटील), श्री. धनाजी बरडे, श्री. प्रमोद शिंदे, श्री. बापू दुबळे, श्री. संतोष गुंड, श्री. पवन व श्री. संदिप गुंड, श्री. रणजित माने, श्री. काळदाते, श्री. नारायण माने, श्री. प्रविण घेमाड, श्री. रामभाऊ लोखंडे, श्री. गणेश ठाकरे, श्री. दत्ता भोगे, श्री. अक्षय वांगदरे, श्री. अक्षय ठाकरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. विनया आणि श्री. महेश निंबाळकर या दांपत्याच्या वतीने भटक्या, वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘स्नेहग्राम’ हा निवासी प्रकल्प चालविला जातो. निंबाळकर दांपत्याचे हे कार्य २००७ सालापासून सुरू आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या सरकारी शिक्षकी पेशाचाही त्याग केला आहे.
भीक मागणारी, शाळाबाह्य, अनाथ, लैंगिक शोषण झालेली, कैद्यांची मुले निंबाळकर दांपत्याने पालावर स्वतः फिरून गोळा केली. त्यांना शिक्षणाची गोडी लावली. मात्र पूर्णवेळ निवासी प्रकल्प उभा केल्याखेरीज अपेक्षित उद्दिष्ट साध्य होणार नाही हे ओळखून त्यांनी ‘स्नेहग्राम’ची स्थापना केली. त्यातूनच भटक्यांच्या शाळेची संकल्पना पुढे आली. स्नेहग्रामच्या या कार्याची दखल आनंदवनाचे प्रणेते असणाऱ्या आमटे परिवारानेही घेतली. डॉ. विकास आमटे व श्री. कौस्तुभ आमटे यांनी निंबाळकर दांपत्याला मदतीचा हात दिला. प्रिसिजन समूहाने देखील २०१८ साली ‘प्रिसिजन गप्पां’मध्ये सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन ‘स्नेहग्राम’चा गौरव केला होता.
या पार्श्वभूमीवर आज या प्रकल्पात प्रिसिजन समूहाच्या सीएसआर फंडातून निवासी शाळेची वर्गखोली व शिक्षक निवास यांचा भूमीपूजन समारंभ पार पडला. शाळेच्या माध्यमातून आता या प्रकल्पात शिक्षणाची गंगा अवतरणार आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. शंकर अंकुश, श्री. राजेंद्र कादळगावकर, श्री. सचिन देशमुख,श्री. नारायण माने, सौ. वर्षा चाबुक यांनी परिश्रम घेतले.