September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

स्थानिक गुन्हे शाखेचे अवैध वाळू माफियांवर धाडसत्र अक्कलकोट दक्षीण, मोहोळ, कामती, व सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत ४ ठिकाणी कारवाई

सोलापूर ; महाराष्ट्र स्पीड स्पीड

Advertisement

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेदराव पाटील यांना सोलापूर जिल्हयातील नदीमधून चोरून वाळू
उपासा करून त्याची विक्री करणारे लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पोनि
सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून
जिल्हयातील अवैध वाळू उपसा व विक्री करणारे लोकांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून सदर
पथकांनी दिनांक ०७/०४/२०२१ व दिनांक ०८/०४/२०२१ या दोन दिवसामध्ये ०४ ठिकाणी
कारवाई केली आहे. त्यामध्ये एकूण ३६,९६,५००/- रूपयांचा मुद्देमाल त्यामध्ये ४ टेम्पो, १ ट्रक, १
ट्रॅक्टर, वाळू व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) अक्कलकोट – दिनांक दि.०८-०४-२०२१ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत मौजे.
मुंढेवाडी गावातील जि.प.शाळेसमोरील रोडवर १ ट्रक व २ टेम्पो हे गुडेवाडी गावचे शिवारातील भिमा
नदी पात्रातून एकूण ९ ब्रास वाळू चोरुन घेऊन जात असताना मिळून आले. सदरची वाहने व वाळूसह
२६,९०,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ट्रक व टेम्पो चालक, मालक यांच्यासह एकूण
०६ आरोपीविरूध्द अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२१ भा.द.वि.कलम.
३७९,३४, पर्या. का. कलम . ९, १५ तसेच मो वा का कलम – १३०/१७७, ३/१८१ अन्वये गुन्हा
दाखल केला आहे.
२) मोहोळ – दिनांक ०८-०४-२०२१ रोजी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे. मोहोळ येथील कन्या
प्रशाला जवळून एक टेंपो मध्ये मौजे. आष्टे येथील सिना नदी पात्रातून २ ब्रास वाळू चोरुन घेऊन जात
असताना मिळून आला टेंपो व वाळूसह मिळून ३,१०,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला असून टेम्पो चालक व मालक यांच्या विरूध्द मोहोळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३२५/२१
भा द वी कलम. ३७९,३४, पर्या. का. कलम . ९, १५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
३) सोलापूर तालुका – दि. ०७/०४/२०२१ रोजी मौजे बिबी दारफळ ते सावलेश्वर रोडवर एक
विनानंबर ट्रॅक्टर, विनानंबर ट्रॉली वाळुसह मिळून आल्याने सदर ट्रॅक्टर चालक यास ताब्यात घेऊन
त्याचे त्याचेकडील ट्रॅक्टर व ट्रॉली त्यामधील एक ब्रास वाळू असा एकूण ४,०५,000/- रू.चा मुद्देमाल
मिळून आल्याने त्याचेविरुद्ध सोलापूर तालुका पो. स्टे ला गु. र. नं.१७७/२१ गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

४) कामती – दि. ०७-०४-२०२१ रोजी कामती पोलीस ठाणे हद्दीतील मौजे. विरवडे बु.ता.मोहोळ
येथील नदी पात्रात चोरून वाळू भरताना एक टेम्पो मिळून आल्याने त्यास पथकामार्फत छापा टाकून
पकडण्यात आले आहे. त्यात १ ब्रास वाळू व टेम्पो वाहन आणि आरोपीचे मोबाईल असा एकूण –
२,९१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ६ इसमा विरुध्द कामती पोलीस स्टेशन येथे
रितसर गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस
अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे
नेतृत्वाखाली श्री.शाम बुवा, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अमित सिद-पाटील, पोलीस उपनिरीक्षक
यांच्या पथकातील सहा.फौ.शिवाजी घोळवे, पोह श्रीकांत गायकवाड, सर्जेराव बोबडे, प्रकाश कारटकर,
सलीम बागवान, राजेश गायकवाड, विजयकुमार भरले, पोना गणेश बांगर, परशुराम शिंदे, लाला
राठोड, हरीदास पांढरे, रवी माने, पोकॉ अमोल जाधव, विलास पारधी, मनोज राठोड,सचिन मागाडे,
केशव पवार, अजय वाघमारे, राहूल सुरवसे यांनी बजावली आहे.

Leave a Reply