October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण व पांगरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दुचाकी व मोबाईल चोरटे जेरबंद

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

दुचाकी  मोटार सायकलसह मोबाईल चोरी करणा-या चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर व पांगरी पोलिसांना  मुसक्या आवळण्यात यश आले आहे.तिघांना आज बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांचे पथक जिल्हयातील फरारी आरोपीचा शोध घेत असतांना मोहोळ येथे बातमीदारामार्फत बातमी
मिळाल्याप्रमाणे त्यांना दोन इसमांवर संशय आल्याने त्यांनी आरोपी  सचिन
सुभाष शिंदे वय २४ वर्षे रा उपळे (दु) व अजय सुनिल भोसले वय २३ वर्षे रा धनेगाव ता तुळजापुर जि उस्मानाबाद
यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी खोटी व उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांचा संशय बळावला.
त्यानंतर त्यांना ताब्यात घेवुन अधिकचा तपास केला असता त्यांचेकडे चार मोटार सायकल व १० पावत्या नसलेले
चोरीचे मोबाईल मिळुन आले.त्यांचे जवळील मोटार सायकलबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास केला
असता ती पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील ममदापुर ता बार्शी जि सोलापुर येथील असल्याचे उघडकिस आले आहे.
त्यानंतर पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल यांनी पांगरी पोलीस ठाणेस दाखल गुन्हयामध्ये
वरील दोन आरोपीना वर्ग करून घेवुन अटक करून त्यांचेकडे तपास केला असता आरोपींनी व त्यांचे इतर साथीदार
यांनी मिळून विविध ठिकाणावरून मोटार सायकल व मोबाईल चोरी केली असल्याचे सांगितले.
  त्याप्रमाणे हवालदार शैलैश चौगुले व पांडुरंग मुंढे यांनी उपळे दुमाळा येथुन तुषार जयदेव मगर वय २० वर्षे यास ताब्यात घेवुन चौकशी केली
असता.त्यांने पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील नारी येथील देखील एक मोटार सायकल साथीदारांच्या मदतीने चोरल्याचे सांगत आहे. त्यास देखील सदर
गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी
देण्यात आली. सदर आरोपीतांकडुन एकुण ४ मोटार सायकली व १० मोबाईल हॅन्डसेट चोरी केल्याचे निष्पन्न
झाल्याने जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण व पांगरी पोलीस ठाणे यांनी
कौशल्यपूर्ण संयुक्त कारवाई करून ०३ आरोपींना अटक करून त्यांचकडुन चोरीच्या ४ मोटार सायकल व १० मोबाईल
हस्तगत केले आहेत. सदर आरोपीने आणखी कोठे कोठे चोरी केली आहे याचा अधिकचा तपास व त्यांच्या इतर साथीदारयांचा शोध पांगरी पोलीस करीत आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस उप अधिकक्षक अरूण
सावंत,उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर  यांचे मार्गदर्शनाने
स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/पारेकर व पोना शिंदे तसेच पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल
व त्यांच्या पथकातील शैलेश चौगुने,पांडुरंग मुंडे, सुनील बोदमवाड,उमेश
कोळी, बिरकले, धोत्रे, घुले यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply