स्त्री हीच अनंत काळासाठी प्रेरणादायी शक्ती ; ह.भ.प. श्री रंगनाथ काकडे.

बार्शी ;
केवळ महिला दिनानिमित्त महिलांचे कौतुक न होता सदासर्वकाळ स्त्री हीच अनंत काळासाठी प्रेरणादायी शक्ती आहे. समाजातील विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकतृत्वाची, सामर्थ्याची समाजाने दखल घेऊन त्यांना सन्मान देणे, महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करणे हीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे. तिचे संवर्धन करण्याचा संकल्प जबाबदार नागरिक म्हणून आपण महिला दिनानिमित्त करु या हीच श्रेष्ठ मातृभक्ती ठरेल…. ह.भ.प. श्री रंगनाथ काकडे.
महिला दिना निमित्ताने दत्तगुरु बहुद्देशिय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्त्रीरत्न गौरव सोहळा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तथा जनहित सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल बनसोडे , अजित कुंकूलोळ, दत्तगुरु संस्थेच्या अध्यक्षा चंद्रकला बोरगावकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक श्रीधर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. संगिता वाघुले यांनी केले.
सावळे सभागृहात कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून अत्यंत दिमाखात हा गौरव सोहळा पार पडला.सूत्रसंचालन सौ. शिल्पा मठपती यांनी केले तर कार्यक्रमासाठी स्वप्नील तुपे,प्रसाद दाभाडे ,सिद्धार्थ नांदेडकर, नागेश मनगिरे यांनी परिश्रम घेतले.
स्त्रीरत्न पुरस्काराचे मानकरी-
सौ. प्रिती सुदर्शन इरेगौडा-अय्यंगार(उद्योजिका)
सौ. शिल्पा संदीप मठपती(लेखन/पत्रकारीता)
सौ. ज्योती दिनकर सापनाईकर(उद्योजिका)
अॅड.सौ. सुप्रिया शेखर गुंडपाटील(विधी सेवा)
अॅड.सौ. वर्षा नानासाहेब साखरे(विधी सेवा)
सौ. मिरा विश्वनाथ कित्ती(बँकिंग क्षेत्र)
सौ. छाया कुलकर्णी(लेखन/शैक्षणिक कार्य)
सौ. जयमाला नंदकुमार गरड(सामाजिक/शैक्षणिक कार्य)
सौ. स्वाती प्रल्हाद काटे-भालेराव(पोलिस सेवा)
सौ. यशोदा कल्याण भिसे(पोलिस सेवा)
श्रीमती संगिता संजय जाधव(होमगार्ड सेवा)
श्रीमती शोभा प्रभाकर वासकर(होमगार्ड सेवा)
श्रीमती अर्चना विठ्ठल थिटे(वैद्यकीय सेवा)
सौ. वंदना दत्तात्रय यादव(वैद्यकीय सेवा)
सौ. शुभांगी अण्णासाहेब नेवाळे(तंत्रशिक्षण/रोजगार निर्मिती)
कु. रुपाली हनुमंत तावडे(बस प्रवासी सेवा)
सौ. सुशिला मल्लिकार्जुन कांबळे(फिटनेस कोच)
श्रीमती आशा सुरेश भाळशंकर(कॅन्टीन सेवा)
श्रीमती अनुसया किसन आगलावे(सामाजिक/अंगणवाडी सेविका)
सौ.अनिता संजय बोधले(सामाजिक/अंगणवाडी सेविका)
कु. साक्षी प्रदीप गायकवाड(अभिनय/नृत्य)
कु. स्वप्नाली गौतम अवघडे(अभिनय/नृत्य)
सौ. अमृता अजित कुंकूलोळ(सामाजिक/रक्तदान चळवळ)
सौ. उज्ज्वला सचिन पलसे(बचतगट कार्य)
सौ. रुपाली भगवान जाधव(शासकीय योजना)
सौ. मिना अरुण कडवे(घरगुती उद्योग)
कु. वंदना साहेबराव गादेकर(तंत्रशिक्षण कार्य)