February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

स्कुटीच्या धडकेत परंडा तालुक्यातील एकाचा मृत्यू


बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

नैसर्गिक विधी उरकुन हाॅटेल कडे जाणा-या हाॅटेल कामगारास स्कुटीचालकाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात कामगाराचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचा प्रकार बार्शी-परंडा रस्त्यावर उपळाई ठोंगे ता.बार्शी शिवारात घडला.
#महमंद गौस जहिरुद्दीन शेख रा. दिक्षीत प्लॉट,अलिपुर रोड बार्शी असे अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

#गोकुळ अजिनाथ वीर वय 55 वर्षे रा.हिंगणगाव ता.परांडा
असे अपघातातील मयताचे नाव आहे.

#रामेश्वर हनुमंत मारकड वय 51 वर्षे रा. हिंगणगाव ता.परांडा जि.उस्मानाबाद यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते   घरी असताना  गावातील  ठोंगे याचा फोन आला की, तुझे आत्याचा मुलगा गोकुळ वीर याला मोटार सायकलने परांडा रोडला जगदंबा हॉटेलजवळ धडक दिलेली आहे. ते मोटार सायकलवर जगदंबा हॉटेल परांडा रोड, उपळाई ठोंगे शिवार येथे आले असता तेथे बरीच गर्दी जमलेली होती माझे आत्याचा मुलगा गोकुळ वीर हा रोडचे डावे बाजुस मयत अवस्थेत पडलेला दिसला.
  त्याचे बाजुला एक स्कुटी मोटार सायकल पडलेली दिसली त्याचा नंबर एम एच 13 सी डी 6446 असा होता. वीर यास धडक देणारे स्कुटी चालकाचे नावाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव महमंद गौस जहिरुद्दीन शेख रा. दिक्षीत प्लट अलिपुर रोड बार्शी असे असल्याचे समजले.
   महमंद गौस जहिरुद्दीन शेख रा. दिक्षीत प्लट अलिपुर रोड बार्शी याने रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन स्कुटी भरधाव वेगात चालवुन  गोकुळ यास जोराची धडक देवुन गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply