सोशल मिडीच्या कारणावरून बार्शीत कुकरी, गजाने मारहाण, अन्नछत्रालयाचे नुकसान, नगरसेवकासह आठ जनावर गुन्हा दाखल
बार्शी ;
फेसबुक लाईव्ह व फेसबुकवर पोस्ट टाकण्याच्या कारणावरून अन्नछत्रालयाची मोडतोड करून मंदिरावर दगडफेक करत महापुरूषाची विटंबना केल्याचा प्रकार बार्शी शहरातील देवणे गल्लीत काल दि.2 मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला.
###समीर सय्यद,बापु तेलंग,बादशहा बागवान,साजिद शेख,शरद घाडगे,सुरज भालशंकर व मयुर शिनगारे सर्व रा.बार्शी अशी या घटनेत जखमी झालेल्याची नावे आहेत.
@@नगरसेवक अमोल चव्हाण, चेतन चव्हाण, नाथा मोहिते,भगवान साठे,अतुल शेंडगे,रोहित अवघडे,प्रमोद कांबळे,बाबा सुनील वाघमारे अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
@जखमी समीर सय्यद वय 30 रा.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते व त्यांचे सहकारी हे राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालयात जेवनाच्या डब्याचे पॅकिंग करत असताना अन्न वाटपाच्या ठिकाणी गोंधळ सुरू असल्यामुळे ते बाहेर आले.बाहेर येऊन पाहिले असता रिक्षा व मोटारसायकल वरूण आलेल्या लोकांनी जेवन रस्त्यावर फेकुन दिले असल्याचे दिसले.त्यानंतर जमाव फिर्यादी व त्यांच्या सहका-याकडे आला व कुकरी,लोखंडी गज,काठी व लाकडी दांडक्याने त्याना मारहाण केली.
5 मार्च रोजी भाऊसाहेब आंधळकर हे बार्शी नगरपरिषद येथे घरपट्टी व नळपट्टी बाबत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी फेकबुक लाईव्हवर सांगितले होते.त्याचा राग मनात धरुन अमोल चव्हाण याने चोळी बांगडीचा आहेर तुम्ही काय देता ,आम्हीच तुम्हाला चोळी बांगडी घालुन नाचवु अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती.त्या पोस्टवर पुन्हा कार्यकर्त्यानी अमोल चव्हाण यांचे विरोधात पोस्ट टाकलेली होती असे फिर्यादीत म्हटले आहे
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केदार हे करत आहेत.