October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणीवर पांगरीच्या ज्योत्स्ना डोके यांची बिनविरोध निवड

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीच्या  स्पर्धा सचिव पदी पांगरी ता.बार्शी येथील शिवछत्रपती विद्यामंदिर,या प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना डोके
यांची व क्रीडा सचिव पदी शरदचंद्रजी पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  सुरेश गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

सदर निवडीस बार्शी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार पुजारी, सचिव किशोर डुरे-पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी राजेश उकिरडे, व सौ.वनिता काळे आदी सर्व तालुका कार्यकारिणी सदस्यांसह मुख्याध्यापकांचे सहकार्य लाभले.

कृती समितीचे उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, आण्णा मोरे, मुकुंद मोहिते, पाटकुलकर, धनंजय चिकने, चव्हाण, व्हनाळे, देशमुख, विजया खोगरे , वैद्य, गोरे,  वसंत मुंढे,  यांचे सहकार्य लाभले.

*नुतन कार्यकारणी सदस्याचे शिवछत्रपती विद्यामंदिर पांगरी संस्थेच्या संस्थापिका सौ. मंदाताई काळे यांनी अभिनंदन केले. प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply