October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूर जिल्हा परिषदेकडील 388 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ..! विविध संघटनाकडुण आभार

सोलापूर ;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सोलापूर जिल्हा परिषदेकडील 388 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ CEO दिलीप स्वामी यांनी आज मंजूर केला तसे त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे या निर्णयाबद्दल विविध शिक्षक संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे आभार मानण्यात आले.सोलापूर जिल्ह्यातील 388 प्राथमिक शिक्षकांना गेली 1 ते दीड वर्ष वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजूर व्हावा यासाठी संघटनेतर्फे पाठपुरावा केला जात होता पण कोरोनारुपी संकटामुळे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत गेल्या पण आज दिनांक १६ फेब्रुवारी 388 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर झाला आहे यासाठी  संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचे आभार तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  अनिरुद्ध कांबळे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांचेही आभार व्यक्त केले जात आहे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे हाच मानस असल्याचे लाभ मंजूर करताना  स्वामी यांनी सांगितले आहे

Leave a Reply