December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

बार्शी :- महाराष्ट्र स्पीड न्युज
सोलापूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे नुतन अध्यक्ष वसिम रमजानभाई पठाण यांनी सोलापूर जिल्हा ( ग्रामीण) काँग्रेस अल्पसंख्याक कमिटी सर्व तालुका कार्यकारणयासह बरखास्त करीत असल्याचे जाहीर केले आहे.

Advertisement

लवकरच अल्पसंख्याक समाजातील चळवळीतील कार्यकर्त्यांची मोट बांधून देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  व  आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मेळावा घेवून नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे यावेळी वसीम पठाण यांनी सांगितले.

काँग्रेस विचारधारा मानणारया अल्पसंख्याक समाजातील  इच्छुक कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply