October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूर जनता सहकारी बॅंकेवर पुन्हा रा.स्व. संघ पुरस्कृत परिवार पॅनलचे वर्चस्व,परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर

सोलापूर : महाराष्ट्र स्पीड न्युज

सोलापूर जनता सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सत्ताधारी परिवार पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार आघाडीवर असून बॅंकेवर पुन्हा एकदा संघ परिवाराचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत परिवार पॅनलने सर्व 17 जागांसाठी 17 उमेदवार उभे केले होते. हे सर्व ऊमेदवार तिसऱ्या फेरीअखेर विजयाच्या ऊंबरठ्यावर आहेत. रात्री ऊशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अधिकृत निकाल ऊद्या जाहीर होणार आहे.

मल्टीस्टेट शेड्युल्ड दर्जा असलेल्या सोलापूर जनता सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 17 सदस्यांची निवड करण्यासाठी रविवार 14 मार्च रोजी मतदान झाले. वाढते ऊन आणि वाढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी पर्यायाने बॅंकेच्या सभासदांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले होते. कारण बॅंकेचे सोलापूर एकूण 53 हजार 538 मतदार मतदानासाठी पात्र असतानाही अवघ्या 14 हजार 151 मतदारानांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 26.43 टक्के मतदान झाले होते. मतदान कमी झाले तरीही सभासदांनी सत्ताधारी पॅनेललाच झुकते माप दिल्याचे मतमोजणी नंतर दिसून येत आहे. कारण विरोधी बचाव परिवाराचे उमेदवार आणि सत्ताधारी उमेदवार यांच्या खूप मोठया मतांची तफावत दिसून येत आहे. यावरून मतदारांनी एकतर्फी मतदान करून सत्ताधाऱ्यांच्याच हातात पुन्हा सत्ता दिली आहे.

सोलापूर महापालिकेपासून 25 किलोमीटरचे क्षेत्रासाठी 10 संचालक, महापालिकेपासून 25 किलोमीटर बाहेरील क्षेत्रासाठी 4 संचालक, महिला प्रवर्गातून 2 संचालक आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एक उमेदवार अशा एकूण 17 संचालकांची निवड सभासदांनी केली आहे.

चांगल्या कामगिरीचा विश्वास : देशपांडे
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवार पॅनल ला घवघवीत यश मिळाले आहे. परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. परिवार पॅनलच्या माध्यमातून उच्चशिक्षित सेवाभावी, कर्तव्यदक्ष व प्रशासकीय अनुभव असणारे उमेदवार उभे केले होते. त्या सर्व उमेदवारांना मतदारांनी भरभरून मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. रा.स्व.संघाच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली निवडून आलेले सर्व उमेदवार चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे.

— किशोर देशपांडे,
पॅनल प्रमुख, परिवार पॅनल

Leave a Reply