सोलापूरच्या महिलेवर बार्शी तालुक्यातील लाॅजवर अत्याचार

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
ओळखीचे रूपांतर प्रेमात करूण सोलापूर येथील महिलेला बार्शी तालुक्यातील व सोलापूर येथील विविध लाॅजवर बोलावून घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असुन बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत सोलापुर येथील एकावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#धनराज अंबय्या मेरगु वय 38 रा.क्रांतीनंतर, सोलापुर असे बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
@याबाबत 37 वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पिडीतेची मेरगु बरोबर ओळख झाली.त्यानंतर पिडीतेशी झालेल्या ओळखीतून संशयीताने प्रेमसंबंध वाढवले.पिडीतेला घर देण्याचा शब्द देऊन दोन वर्ष थांब तु निम्मे पैसे दे मि निम्मे पैसे घर बांधण्यासाठी देतो असे ठरले.
त्यावेळी पिडीतेने त्याला विविध ठिकाणावरुन बचत गटाचे कर्ज काढुन व युनियन बँकेतुन मुद्रा लोन काढुण धनराजला 1300000/-रु दिले. तसेच पहिल्यांदा
धनराज याने पिडीतेस बार्शी तालुक्यातील लॉजवर भेटण्यास बोलाविले तेथे
त्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन अत्याचार केला व सदरबाबत कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.त्यानंतर ते वारंवार
वैशाली लॉज येथे भेटले. त्यानंतर
पुन्हा धनराज याने सोलापुर येथे
सन 2019 मध्ये 3 ते4 वेळा अत्याचार केला आहे.
दि.25/12/2020 रोजी पिडीतेने धनराजला फोन केला असता ,मी 5 मिनीटात पैसे घेऊन येतो असे म्हणाला.मात्र तो बोलल्याप्रमाणे पैसे घेऊन आला नाही.तसेच पिडीतेच्या रुमवर येऊन तु फोन करायचा नाही ,भेटायचे नाही,माझ्या नादी लागायचे नाही,तु मला पैसे दिले नाही,तु जर मला त्रास दिलेस तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही असा बोलुन तो निघुन गेला संमतीवाचुन अत्याचार करुन फिर्यादीचे घेतलेले पैसे परत न देता फसवणुक करुन ,दमदाटी केली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे करत आहेत.