June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापुरच्या प्रार्थना फाऊंडेशनचा बार्शीत उपक्रम रेड लाईट एरियातील महिलांच्या मुलांना व आत्यहत्याग्रस्त शेतकèयांच्या मुलांना मदत

  बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

– आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या मुलांना तसेच रेड लाईट एरियातील मुलांना शालेय साहित्य व स्वेटरचे वाटप करण्यात आले. सोलापूर येथे अनाथ मुलांचे संगोपन करणा-या प्रार्थना फाऊंडेनशचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी बार्शीत येऊन या मुलांसाठी हा उपक्रम घेतला. मुले वेगाने शैक्षणिक प्रवाहात यावीत हा एकमेव उद्देश ठेऊनच हा उपक्रम घेतला असल्याचे माहिते म्हणाले.बार्शीतील सावळे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रार्थना फाऊंडेशनचे प्रसाद व अनु मोहिते  हे दांम्पत्य सोलापुरात कौतुकास्पद काम करत आहेत. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते हे मुळ बार्शी तालुक्यातील साकतचे असल्याने ज्या मातीत आपण वाढलो आणि मोठे झालो तीचे स्मरण कायम असावे या उदात्त हेतूनच येथील वंचित मुलांसाठी सोलापुरातून बार्शीत येऊन आपण हा उपक्रम घेतला असल्याचे मोहिते यांनी सांगितले. या उपक्रमामुळे शालेय साहित्याअभावी शाळेपासून दूर जाण्याच्या बेतात असलेली मुले शाळेत दप्तर घेऊन जातील असा विश्वास आपल्याला असल्याचेही मोहिते यांनी सांगितले. एकेबाजूला हे दांम्पत्य वंचितांसाठी प्रकल्प उभा करून त्यांच्यासाठी काम करीत आहेत, तर दुसèया बाजूला प्रसाद मोहिते हे श्रमावर प्रेम करत व निष्ठा ठेवत सोलापुरात रिक्षा चालवत आहेत. यातूनही बार्शीसाठी काही तरी देणे लागतो या भावनेने त्यांनी अत्यंत चांगला उपक्रम घेतला.या कार्यक्रमासाठी म्होरक्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमर देवकर, अ‍ॅड. विक्रम सावळे, स्मार्ट अ‍ॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्राचे संचालक सचिन वायकुळे, कवी रामचंद्र इकारे, उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, कवी मदन दंदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे तोडभरून कौतुक करताना येणा-या काळात आपणही आपल्यापरीने मदत करू, असे अभिवचन मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लेश इपोळे, भाग्योदय इपोळे, तानाजी तेली, मुतप्पा भारते आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply