October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सुंदरराव जगदाळे ग्रामविकासाची जबाबदारी नक्कीच पार पाडतील; माजी मंत्री सोपल

#बार्शी:

सुंदरराव जगदाळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गावातील जनतेने नेत्रदिपक यश दिले आहे.यशाच्या आनंदाबरोबरच जबाबदारी मोठी आहे.ही जबाबदारी सुंदरराव नक्कीच पार पाडतील याची मला खात्री आहे असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले.ते चारे ता.बार्शी येथे बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांचा वाढदिवस व चारे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्याच्या सत्कार समारंभानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

Advertisement


यावेळी व्यासपीठावर सत्कार मुर्ती सुंदरराव जगदाळे, विलास रेणके,बंडु माने,नागेश अक्कलकोटे,युवराज काटे,डाॅ.अरूण नारकर, जि.प.सदस्या सौ.रेखाताई राऊत, श्रीमंत थोरात, नंदकुमार काशिद,गणेश जाधव,शुभाष शेळके,मुन्ना डमरे,नाना गायकवाड, मणिष चौहाण,अरूण सावंत,रामभाऊ देशमुख,बापु काळे आदी उपस्थित होते.
  माजी मंत्री सोपल पुढे बोलताना म्हणाले की कोरोणा काळात मी जनतेशी भ्रमणध्वनीवरून संपर्कात होतो.मी अनलाॅक कधीच नव्हतो.मी राजकीय निवृत्ती घेतली नसुन शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी लढत राहणार आहे.
#सत्कारास उत्तर देताना गटनेते सुंदरराव जगदाळे म्हणाले की आज मी येथे चारे येथील जनतेने दिलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी उभा आहे.चारेची माती हीच माझी पंढरी,चारेची जनता हाच माझा पांडुरंग आणि पुंडलिकाच्या भक्तीभावाने जनसेवेच्या वाटेवर चारेत विकासाचा विठ्ठल उभा करेण असा विश्वास त्यांनी चारेकरांना दिला.ग्रामपंचायतीमधील ठेकेदारीचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण येथुन पुढे आपणास पहावयास मिळेल.शासनाच्या अणेक योजना असुन गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचुन आणुन भौतिक सुविधा सोबतच गावात सामाजिक बंधुभाव व जातीय सलोखा कसा राहील याकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल असेही जगदाळे म्हणाले.
# यावेळी नंदकुमार काशिद, रेखाताई राऊत, नागेश अक्कलकोटे,संपत काळे आदीनी यावेळी विचार व्यक्त केले..

चौकट;-
चौकट;- सुंदरराव जगदाळे;-
सोपल साहेबांनी भविष्यात 25 गावांची जरी जबाबदारी दिली तरी मी समर्थपणे पार पाडीण.साहेबांनी दिलेली जबाबदारी शिरसावंद्य असेल.

Leave a Reply