October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सासुरवाडीला निघालेल्या बार्शीच्या जावयाची दुचाकी व मोबाईल चोरट्यांनी केला लंपास..

सोलापूर ;महाराष्ट्र स्पीड न्युज

दारूच्या नशेत सासुरवाडीलl दुचाकीवरूण जाताना पडलेल्या जावयाची दुचाकी व खिशातील मोबाईल हॅण्डसेट वर चोरट्यांनी चक्क डल्ला मारून 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील बावी आ. शिवारात घडलl.

Advertisement

#गणेश तानाजी लोंढे वय 28वर्षे, रा.तीरवंडी, ता.माळसिरस जि.सोलापूर यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते सायंकाळी 05.30 वा.चे सुमारास मेहुण्या बरोबर बोरगाव झाडी ता.बार्शी येथे जाण्या करिता त्याच्या मालकिच्या मो.सा वरून निघाले.
नंतर ते आकलुज वरून टेभुर्णी येथे आले.  टेभुर्णी येथे त्यांच्या दुचाकीची लाईटची दुरूस्ती करून कुर्डूवाडी येथे आले. कुर्डवाडीतील चौकातील टपरीवर फिर्यादी दारू पिले. व सोबत एक बटल घेवून बार्शीकडे निघाले. नंतर बार्शीतुन पुढे निघालो असता रेल्वेपुलाचे पुढे हॉटेल समोर ते सोबत असलेली एक बॉटल पिले. तेथुन पुढे जात असताना काही अंतरावर  दारू ची नशा जास्त झाल्यामुळे  दारूच्या नशेत गाडीवरून खाली पडले.
  पडलेली गाडी स्डँन्डवर उभी करून ते रोडच्या बाजुला झोपले. नंतर  पहाटे 05.00 वा जाग आली तेव्हा  लावलेली मोटार सायकल व  मोबाईल दिसला नाही. म्हणून त्यांनी रस्त्याच्या बाजुला असलेल्या वस्तीवरील घरा जवळ जावुन घरातील लोंकाना उठवण्याचा प्रयत्न केला पंरतु घरातील लोक कोणी न उठल्यामुळे ते घरासमोर झोपले.
नंतर  सकाळी 06.00 वा.चे.सुमारास जाग आल्याने ते झोपेतुन उठले.  बावी(आ) ता.बार्शी येथील स्वामी समर्थ वस्ती जवळ होते. त्यांनी व सासाऱ्यानी मिळून मळेगाव,जामगाव,बावी(आ) या ठिकाणी मो.सा. गाडीचा व मोबाईलचा शोध घेतला पंरतु मोटार सायकलचा व मोबाईलचा शोध लागला नाही. चोरट्यांनी 30,000/-रु. किमतीची दुचाकी व  पाच हजाराचा मोबाईल लंपास केला.
  बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply