March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सावधान, इन्कम टॅक्स च्या नावावर अडकवल जातय जाळ्यात…हॅकर्सनी सुरू केलीय फसवणुक

नवी दिल्ली – सर्व टॅक्स पेयर्स ज्यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करतात. तेव्हा आपला रिफंड परत मिळवण्यात काही दिवस लागतात. काही वेळा एक महिन्यापासून ते तीन, चार महिन्यांचा वेळ देखील लागू शकते. याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत आहेत. ते चुकीची माहिती सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करत असव्याची माहिती आता समोर आली आहे. सोमवारी आलेल्या एका नवीन रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. हॅकर्स युजर्सचा डेटा मिळवण्यासाठी त्यांना विविध पद्धतीने आकर्षित करत आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न सांगून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.

Advertisement

काही लोकांनी संशयास्पद मेसेज येत आहेत. ज्यामध्ये लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसाठी अर्ज सबमिट करण्यास सांगितले जात आहे. यानंतर लोकांना एक लिंक पाठवून त्याद्वारे वेबपेजवर रि-डायरेक्ट केले जाते. हे दिसायला आयकर ई-फायलिंग वेब पेज सारखे दिसते. यादरम्यान फ्रॉड करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय (ICICI), एचडीएफसी (HDFC), एक्सिस बँक (Axis Bank) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या नावाचा वापर केला जात आहे.

दिल्ली बेस्ड थिंक टँक सायबरपीस फाऊंडेशनसोबत सायबर सिक्योरिटी फर्म ऑटोबोट इन्फोसिकने याची माहिती उघड केली आहे. या फ्रॉडमध्ये सेफ https च्या जागी सामान्य http प्रोटोकॉलचा वापर केला जात आहे. यावरून स्पष्ट होते की, कोणत्याही नेटवर्क किंवा इंटरनेट ट्रॅफिकला रोखता येऊ शकते. युजर्संचा चुकीचा वापर करून त्याची माहिती सहज प्राप्त करू शकता येते. याशिवाय यात युजर्संना गुगल प्ले स्टोरच्या जागी थर्ड पार्टी सोर्सवरून App डाउनलोड करण्यास सांगितले जाते.

ज्यावेळी ग्रीन रंगाच्या प्रोसीड टू द व्हेरिफिकेशन स्टेप्स बटनवर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांचे पूर्ण नाव, पॅन, आधार नंबर, पत्ता, पिनकोड, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ई-मेल एड्रेस, जेंडर, वैवाहिक स्थिती, आणि बँकींग माहिती जसे अकाउंट नंबर, आयएफसी कोड , कार्ड नंबर एक्सपायरी डेट, सिव्हीव्ही, कार्ड पिन सारखी माहिती भरा, असे सांगितले जाते. तसेच ऑनलाईन बँकिंगसाठी युजरनेम आणि पासवर्ड देखील मागितला जातो. मात्र युजर्सनी अशा फ्रॉडपासून सतर्क राहणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply