सारोळे सरपंचपदाचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत बाळराजे गाटे यांचे जिल्हा अधिकाऱ्याना निवेदन

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील सारोळे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण कायम ठेवण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सर्वसाधारण इतर मागास प्रवर्गासाठी सुटले असताना हायकोर्टात याचिका दाखल झाल्याने येथील ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
याबाबत माजी सरपंच बाळराजे ऊर्फ रविराज गाटे व उपसरपंच जितेंद्र चौधरी यांनी जिल्हाअधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देऊन आहे ते आरक्षण ठेवण्याची मागणी केली आहे.
Advertisement
2000 साली इतर मागासप्रवर्ग ला संधी मिळाली होती. त्यानंतर 2021 ला पुन्हा ते पडले. तहसीलदार प्रदीप शेलार यांनी अत्यंत पारदर्शीपणे सोडत प्रक्रीया राबवली.त्यात लकी ड्रॉ पध्दतीने 22 पैकी 18 महिला चिठ्या काढण्यात आल्या. त्यात सारोळे इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी आरक्षण जाहीर झाले.
त्यानंतर याविरुद्ध विरोधी सदस्याने हायकोर्टात याचिका दाखल करून इतर मागासप्रवर्ग महिला आरक्षण काढावे मागणी केली आहे.
निवेदनात
प्रशासनाने जनतेसमोर पारदर्शीपणे काढलेले जाहीर आरक्षण बदलू नये. व आहे ते आरक्षण ठेवावे. ह्या ठिकाणी महिलेला ही संधी मिळते.असेच आरक्षण बदलत लोकाना त्रास देऊ नये. राजकीय द्वेष करण्यासाठी जाणीवपूर्वक विरोधक प्रयत्न करत असताना आपण कायद्याने आहे ते आरक्षण कायम ठेवावे व न्याय द्यावा.
अशी मागणी माजी सरपंच रविराज गाटे यांनी जिल्हा अधिकारी यांचेकडे केली आहे. ह्या निवेदनावर नूतन 8 ग्रामपंचायत सदस्यांचे सह्या आहेत.