June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करावे – राजेंद्र राऊत बार्शीतील मोक्षधाम प्रकल्पाला आएसओ ९००१, २०१५ चे मानांकन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

प्रसन्नदाता मंडळाने केवळ सार्वजनिक गणेशोत्सव, जयंती उत्सव, मोक्षधाम सुशोभिकरण पुरते मर्यादित काम न करता, गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत, शहरातील बेवारस प्रेतावरील अंत्यसंस्कार, आरोग्यविषयक वेळोवळी मदतकार्य अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवून मंडळाची प्रतिमा उजळली आहे. मोक्षधामच्या कामासाठी प्रसन्नदाता मंडळाने पुढाकार घेतला, त्याप्रमाणे शहरातील सेवाभावी संस्थांनी पुढे येवून शहरातील निगर्सरम्य वातावरण निर्माण केलेल्या, सुशोभित केलेल्या बागांची निगा राखावी, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करावे असे प्रतिपादन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
इंटरनॅशनल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस प्रा.लि. संस्थेकडून प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट या संस्थेच्या मोक्षधाम विकास प्रकल्पाला गुणवत्ता, व्यवस्थापन पध्दतीसाठी मंगळवारी दि.१६ रोजी आएसओ ९००१, २०१५ मानांकन प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. त्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र संस्थेला वितरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, अध्यक्ष कमलेश मेहता, फुटरमल मेहता, संदिप बारंगुळे, बंडू माने, बसवेश्वर गाढवे, सोमनाथ पंडित, माेहन अणवेकर, आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, प्रसन्नदाता मंडळाने सर्वांचा विश्वास संपादन केला, मंडळाच्या कामासोबत सामाजिक बांधीलकी जोपासत हिंदू स्मशानभूमीचा कायापालट केला. पूर्वी नगरपरिषदेला खर्च करण्यासाठी मर्यादा होत्या, जकात, घरपट्टी, पाणीपट्टीवर मर्यादित स्वरूपाचे काम होत असतांना मंडळाने काम हाती घेत दोन आयएसओ प्रमाणपत्राचे निकष पूर्ण केले हे साधे काम नाही. बार्शीत काम करतांना सर्वांचा समन्वय साधण्याची कला कमलेश मेहता यांच्याकडे आहे. बार्शीतील विचित्र राजकारण आहे, सत्ताधारी आणि विरोधक यांना दोघांना एकत्र आणण्याचे काम केले. गॅसदाहिनीच्या कामात थोडा राजकिय त्रास झाला परंतु त्यामध्ये काही गैरप्रकार नव्हता. चांगल्या, प्रामाणिक कामामुळे नगरपरिषदेचा विश्वास प्रसन्नदाता मंडळावर आहे. मोक्षधामच्या चांगल्या कामासाठी देणगीदारांचे मोठे योगदान आहे.
नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी म्हणाले, बार्शी नगरपरिषदेची स्मशानभूमी म्हणून ओळख असलेली आता मोक्षधाम म्हणून नावलौकिक झाला, परराज्यातूनही अनेकांनी येथे भेट  देवून चांगल्या कामाचे कौतुक केले आहे.
मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील म्हणाल्या, प्रसन्नदाता मंडळाने खूप मोठी गोष्ट अॅचिव्ह केली आहे. सगळ्या बाबतीत आपण आपले स्कील वापरतो, परंतु अंतीम संस्कारासाठी चांगली सेवा देत आयएसओ मानांकन मिळवेले, गॅसदाहिनीसारखे उपकरण वापररुन पर्यावरणपूरक अंतीम संस्कार होण्यासाठी पुढाकार घेतला. नगरपरिषद सुविधा देते परंतु त्यातून पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम आणि स्मशानभूमीचे केलेले सुशोभिकरण याला तोड नाही. एखादे गणेश मंडळ काय करु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून या मंडळाचे देता येईल.

Leave a Reply