सामाजिक न्यायाचा लढा आणखी तीव्र करणार -सुनील आवघडे

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
समाजातील शेवटच्या घटकाला शासनाचे लाभ मिळवून देण्याकरिता पीडित वंचित,शोषितांना सोबत घेऊन सामाजिक न्यायाचा लढा दलित महासंघाच्या माध्यमातून आणखी तीव्र करणार असे प्रतिपादन दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील आवघडे यांनी केले. शासकीय विश्रामगृह बार्शी येथे दलित महासंघाची बार्शी शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठक पार पडली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी नूतन बार्शी तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी पांगरीचे संतोष बगाडे, दलित महासंघ तालुका सचिन क्षीरसागर तर समाज माध्यम संपर्कप्रमुख म्हणून देवा कानडे यांची निवड करण्यात आली.
अवघडे पुढे बोलताना म्हणाले की दलितासाठीच्या शासनाच्या योजना म्हणजे हाताच्या कोपरा ला मधाच बोट लावल्यासारखं असून धड खाताही येईना आण सोडून देता येईना अशी अवस्था झाली आहे सामाजिक स्तर उंचावण्यासाठी व शासनाच्या योजना पदरात पाडून घेण्यासाठी त्या योजनेत काही बदल करणे आवश्यक आहे त्याकरिता रस्त्यावरच्या लढाई बरोबरच न्यायालयीन लढाई देखील लढावी लागेल असे सांगितले येणाऱ्या काही दिवसात संघटनात्मक बांधणी करून गाव तिथे शाखा निर्माण करणार असून शासनाच्या अखत्यारीत असलेल्या गायरान वनखात्याच्या व इतर पडीक जमिनी दलित भूमिहीन शेतमजुरांना कसून खाण्याकरिता मिळाव्या यासाठी चा लढा देखील उभारणार असे सुनील आवघडे यांनी सांगितले.
सदरची बैठक दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली यावेळी बार्शी शहराध्यक्ष संदीप आलाट यांनी संघटनेची ध्येय धोरणं सांगून समाज हिताच्या साठी मातंग समाजाबरोबरच इतर समाजानेही सोबत यावे असे आवाहन केले सदरची बैठक तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निलेश खुडे ,हरिश्चंद्र कांबळे, कैलास आडसूळ ,शहर उपाध्यक्ष उमेश मस्तूद ,ता.उपाध्यक्ष उमेश धावारे शहर उपाध्यक्ष राम नवले, नागेश ठोंबरे ,अविनाश ठोंबरे, अमोल कांबळे ,पांडुरंग देवकुळे ,शहर उपाध्यक्ष सतीश झोंबाडे ,संतोष बगाडे, नितीन शिंदे, विजय काळे, दीपक बगाडे ,सुधीर देवरे, सुधाकर भडकवाड, अनिल शिंदे, सचिन चांदणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्तावीक हरिश्चंद्र कांबळे यांनी तर आभार उमेश धावरे यांनी मानले