March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

साकत मध्ये वृद्धास मारहाण करत ९३ हजाराची चोरी , गुरुवारी पहाटेची घटना,वैराग पोलीस ठाणे हद्दीत भितीचे वातावरण

वैराग :महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

  बार्शी तालुक्यातील   साकत  येथे सेवानिवृत्त वयोवृद्ध आरोग्य कर्मचाऱ्याच्या घरात प्रवेश करून अज्ञात तीन चोरट्यांनी चक्क लोखंडी रॉडने बेदम मारहान करत सोने व रोकड असा सुमारे ९३ हजाराचा ऐवज चोरी केला आहे .त्यामुळे वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की एकनाथ दशरथ खटाळ ( वय ७१ ) व कौशल्या एकनाथ खटाळ (वय 65) हे दोघे साकत ता .बार्शी येथे राहतात . त्यांना तीन मुले असून तिन्ही मुले नोकरी निमित्त बाहेरगावी राहण्यास आहेत . २७ जानेवारीला रात्री १० वा. पती-पत्नी जेवण करून घराचे सर्व दरवाजे बंद करून झोपले असता रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला . त्यांनी डोक्यास टोपी , काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली होती . एकाने हातातील लोखंडी गजाने एकनाथ खटाळ यांना मारहाण केली असता त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने पत्नी जागी झाली . चोरटे पतीस मारहान करताना पाहून पत्नी, माझ्या पतीस मारू नका तुम्हाला हवं ते घेऊन जा असे चोरटयांना म्हणाली. म्हणून तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील कात्रीने पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे ( १ तोळे ५ ग्रॅ. ) मिनी गंठण , अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले कापून घेतले .तसेच कपाटातील १२ हजार रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ९३ हजार किंमतीचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले .
याबाबत एकनाथ खटाळ यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास सपोनि – परजने करीत आहेत .

तिन्ही मुले असतात नोकरीसाठी बाहेरगावी
दोन मुले कोकणात शिक्षक म्हणून तर धाकटा मुलगा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर दिघी पोलीस ठाणे , पुणे येथे कार्यरत आहे .

Leave a Reply