साकत ग्रामस्थ व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटन यांच्या वतीने बार्शी तहसील समोर धरणे आंदोलन

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
साकत ग्रामस्थ व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटन यांच्या वतीने गावातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी बार्शी तहसील कार्यालयाच्या समोर असंख्य महिलांच्या उपस्थितीत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
#साकतला जोडणारा रस्ता डांबरीकरण करावा,पानगाव (बाळुमामा) ते साकत रस्त्याच्या साईडपट्टया रुंदीकरण कराव्या,साकत पुलावर आरसिसि पुल उभारावा,गावातील विद्यानगर शाळेला संरक्षक भिंत मंजुर करावी,अतिवृष्टी ग्रस्त लोकांना मदत द्या, साकतमधील गरजु लोकांना तातडीने घरकुल द्या, साकत येथील बेकायदेशीर पणे चालणारी दारू विक्री तातडीने बंद करा, बंधारे करा आदी मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनचे दत्तात्रय मोरे,रावसाहेब लोखंडे, निलकंठ माने,सारिका ननवरे,सगुना कदम,जिजाबाई कुडवे, सत्यशीला ओव्होळ,शोभा काटे, आदी उपस्थित होते