November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सरपंच परिषदेच्या मागण्या मार्गी लावण्याचे शरद पवार,ना.हसन मुश्रीफ,नाना पाटोले यांनी दिले आश्वासन

दत्तात्रय काकडे, अँड . विकास जाधव व पदाधिका-यांच्या प्रयत्नाला यश

Advertisement

मुंबई ;
राज्यभरातील सरापंचासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्यभरात कार्यरत असणाऱ्या सरपंच परिषद महाराष्ट्रच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे.महाराष्ट्रातील ग्रामपंचायतस्तरावर काम करताना सरपंच आणि गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ,पंधराव्या वित्तअयोग खर्च करताना येणाऱ्या अडचणी,पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडू नये ,पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे ग्रामपंचायतमध्येही पॅनल बंदी कायदा करावा या व आदि प्रमुख मागण्यासाठी सरपंच परिषदेच्यावतीने महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांकडे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक आणि भेटी घेऊन पाठपुरावा करण्यात आला. या मागण्याबाबत सविस्त माहिती , महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले. या प्रमुख नेत्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली.राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी पॅनलबंदी करण्याला समर्थता दर्शवत आघाडी सरकारमधील अन्य प्रमुख नेत्याकडेपण तुमची ही मागणी करा, त्यातून लवकर मार्ग निघेल असे म्हटल्याबरोबर विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले ,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,सहकार मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वरील बाबतीत चर्चा झाली.नाना पटोले यांनी  रात्री १० ते ११.३० या दिड तासात सर्व समस्या समजून घेतल्या. आपण या प्रकरणी लक्ष घालून निश्चित आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे म्हटले. सरपंच परिषदेच्या या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,प्रदेश सरचिटणीसअँड , विकास जाधव ,  राज्य विश्वस्त राजाराम पोतनीस,आनंद जाधव, किसन जाधव, राज्य प्रसिद्धीप्रमुख संजय जगदाळे, शत्रुघ्न धनवडे, भूषण कोलते पाटील, सोमनाथ मंडलिक, संतोष कुमार दापकेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply