March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील रस्तापुरात महिला पोलीसास शिविगाळ,धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

शेत मोजणी साठी आलेल्या कर्मचा-यास अडथळा करूण सरकारी कामात अडथळा केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील रस्तापुर शिवारात घडला.

#पांडुरंग विठ्ठल बरबडे,विनोद पांडुरंग बरबडे ,सुबराव पांडुरंग बरबडे व भाग्यश्री उर्फ दीदी
पांडुरंग बरबडे सर्व रा. रस्तापुर ता. बार्शी अशी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नावे आहे.

#नानासाहेब सोपान घुमरे वय-54 वर्षे, रा, नरखेड ता. मोहोळ यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की आज दि.26/03/202 रोजी दुपारच्या सुमारास अर्जदार दादा माणिक बरबडे रा. रस्तापुर ता. बार्शी याचे शेती गट नं.62’मध्ये मोजणी सुरू होती. फिर्यादी हे गावच्या लेखी
आदेशाप्रमाणे अर्जदार नामे- दादा माणिक बरबडे रा. रस्तापुर ता. बाशी याचे गट नं.62 च्या
हादखुणा कायम मोजनी चे सरकारी काम करित असताना फिर्यादीस कायदेशिर सरकारी कामात
अडथळा आणुन पांडुरंग  बरबडे,विनोद  बरबडे, सुबराव  बरबडे फिर्यादीस
शिविगाळ करत धक्काबुक्की करण्यासाठी फिर्यादीकडे येत असताना पोलिसांनी त्यांना बाजुला केले.तसेच महिला पोलीस देवकर यांना भाग्यश्री
पांडुरंग बरबडे हीने शिविगाळी दमदाटी केली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply