समतेच्या शिकवणीत वारकरी संप्रदाय श्रेष्ठ – विरोधी पक्षनेते अक्कलकोटे..यशवंत नगर येथील हरिनाम सप्ताहास प्रारंभ

बार्शी;
सुमारे सातशे वर्षापूर्वी विज्ञानवादी दृष्टिकोन, समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी केले ते गणेश जयंतीनिमित्त यशवंत नगर बार्शी येथे शिवपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी ह भ प नवनाथ महाराज साठे,दत्तात्रय महाराज राऊत,बार्शी प्रेस क्लब चे अध्यक्ष शहाजी फुरडे, संपादक संतोष सूर्यवंशी,पत्रकार गणेश गोडसे,धैर्यशील पाटील, संजय बारबोले, गणेश घोलप, पंकज शिंदे, आण्णा पेठकर,राणा देशमुख ,रामभाऊ मस्के आदींसह भाविक उपस्थित होते
अक्कलकोटे पुढे म्हणाले की, अशा कीर्तन प्रवचनातून वारकरी संप्रदायाच्या आदर्श विचारांची देवाणघेवाण जपवणूक व्हावी यासाठी यशवंत नगर येथील सर्वजण एकत्रित येऊन मागील चौदा वर्षांपासून या सप्ताहाचे अखंडपणे आयोजन करत आहेत हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश,ध्वज व्यासपीठ, ग्रंथ पूजन करण्यात आले आज पहिल्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते गणेश गाढवे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले शुक्रवार दि १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या सप्ताहात शुक्रवारी ह भ प अंकुश महाराज शिंदे, शनिवारी सागर महाराज कोल्हाळे, रविवारी गिरीधर महाराज सामनगावकर,सोमवारी अनिकेत महाराज राऊत,मंगळवारी रामेश्वर महाराज राऊत,बुधवारी नितीन महाराज जगताप, गुरुवारी नवनाथ साठे महाराज ही कीर्तन सेवा दररोज रात्री८ ते १० या वेळेत होणार आहे तर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता शँकर महाराज बडवे पंढरपूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे या शिवाय दररोज सकाळी राम फेरी,भजन,प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सूत्रसंचालन व आभार तुळशीदास मस्के यांनी मानले तरी पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवपुत्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत