March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

संवादासह विविध यशोगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवाव्यात

स्मार्ट अकॅडमीच्या पुढाकाराने आत्महत्या रोखण्यासाठी तरुणांची प्रबोधन बैठक 

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

शहर व परिसरात वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट अकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्राने पुढाकार घेत तरुणांची बैठक घेतली.  संवादावर अधिक भर देत असतानाच विविध क्षेत्रातील   यशोगाथा प्रत्येकाने  तरुणांपर्यंत पोहचवाव्यात असा सूर या बैठकीत उमटला.

अलिकडच्या काही दिवसांत  आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. तणाव ,  निराशा, वैफल्य, अपयश आशा मानसिक अवस्थेतून बहुतांश या घटना घडताना दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शून्यातून स्वतःच्या विश्व निर्मितीचा ध्यास घेत काम करणाराही तरुण वर्ग आहे. हाती शून्य असताना  यशस्वी उद्योग उभा केलेल्या अनेक व्यक्ती  जगभरात जशा आहेत तद्वतच आपल्या भोवतालीही आहेत. आशा यशस्वी व्यक्ती शोधून त्यांच्या यशोगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न प्रत्येकाने कारावेत .आत्महत्येची कारणे शोधत असतानाच   भोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्यासाठी  सर्वच पातळीवर कमी होत असलेला संवाद वाढविला पाहिजे तसेच  काही मिनिटांच्या प्रेरक शॉर्ट फिल्म तयार करून त्या सर्वांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आशा अनेक सूचना तरुणांनी  या बैठकीत मांडल्या. 

स्मार्ट अकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्राचे संचालक सचिन वायकुळे यांच्या मार्गदशनाखाली तरुणांची ही बैठक घेण्यात आली. यामध्ये विजय राऊत, ऍड. हर्षवर्धन पाटील, विवेक गजशिव, ऍड. गणेश हांडे, बालाजी डोईफोडे, शुभम चव्हाण, विशाल मोरे,   ऍड. उषा पवार, बाबासाहेब बारकुल , शुभम तुपे, ओंकार हिंगमीरे, समर्थ तुपे, हरीश डहाके ,  निशिकांत कदम , बिट्टू बारंगुळे यांनी या चर्चेत सहभागी होत रोखठोक मते मांडली तसेच वरील उपाययोजनाही सुचविल्या. 

Leave a Reply