June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

संत तुकाराम बिज; भाविकांना बंदी,नियमावली जाहीर…वाचा सविस्तर..

देहू : राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नियम पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर परंपरागत चालत आलेल्या सोहळ्यांवरही कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सव, आषाढी एकादशीच्या निमित्तानं निघणारी पायवारी यामागोमाग आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. भाविकांसाठी बंदी घालण्यात आली असली हा सोहळा मात्र परंपरागतरित्या साजरा केला जाणार असून, त्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही.

30 मार्चला होणाऱ्या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी तशी नियमावली जाहीर केली आहे.

– ही नियमावली खालीलप्रमाणे

1) केवळ पन्नास भाविकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी

2) पन्नास भाविकांच्या उपस्थीतीच सर्व विधीवत पूजा पार पडणार

3) उपस्थित राहणाऱ्या भाविकांचे पोलीस पास बनवून घ्यावे लागणार

4) उपस्थित राहणाऱ्या पन्नास भाविकांची कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक

5) विश्वस्तांनी भाविकांना देहूत न येण्याचं आवाहन करावं

6) घरी बसून भाविकांना दर्शन घेता यावं, यासाठी लाईव्हची सुविधा उपलब्ध करावी

7) संचारबंदी लागू केली जाणार

Leave a Reply