June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

संगोगी (ब) येथील मंजूर जमादार यांचा प्रामाणिक पणा..

रोख रक्कम असलेले पॉकिट केले पोलिस ठाण्यात जमा

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज
मंजूर जमादार रा. संगोगी( ब) तालुका अक्कलकोट यांना सोलापूर ते मैदर्गी कर्नाटक एस टी बस ने प्रवास करताना दि. २४ ऑक्टोबर रोजी बसमध्ये एक पॉकिट सापडले होते. जमादार यांनी पाकिट उघडून पाहिले असता रोख रक्कम, ए टी एम कार्ड, आधर कार्ड व मिलेटरी कार्ड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जमादार यांनी सर्व वस्तु व पॉकिट आपल्या भाऊ निसार जमादार यांच्याकडे दिले. त्यानंतर सर्व माहिती दिली. निसार जमादार यांनी परिस्थिती ओळखुन आज २४ तास चे न्यूज प्रतिनीधी अशपाक मुल्ला यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. दरम्यान ज्याची पॉकिट हरवले होते त्यांनी देखील म्हणजेच कर्देहळ्ळी ता दक्षिण सोलापूर सध्या राहणार शिवपूरी ता अक्कलकोट येथील जितेंद्र चिंत्तामणी पवार यांनी पॉकिट हरविल्या बाबत उत्तर पोलिस ठाण्यात नोंद केले होते. त्याच दरम्यान निसार जमादार व अशपाक मुल्ला यांनी मिळालेले पॉकिट जमा करण्यासाठी पोलिस निरिक्षक कलप्पा पुजारी यांच्याकडे माहिती दिली. त्यानंतर रितसर नोंद करून घेऊन, जिंतेद्र पवार यांच्याशी संपर्क साधले व पॉकिट मिळाले बाबत माहिती दिली. पोलिसांनी जितेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित जिंतेद्र पवार यांना पॉकिट परत केले. त्यामुळे मंजूर जमादार, निसार जमादार आणि अश्पाक मुल्ला यांच्या प्रामाणिक पणाबध्दल सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
यावेळी उत्तर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, गोपनीयचे धनराज शिंदे, पोलीस हवालदार सलिम पिरजादे, महंमद अन्सारी, योगेश वानखेडे,निसार जमादार, आदी जण उपस्थित होते

Leave a Reply