श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात “प्रजासत्ताक दिन ” साजरा

बार्शी;
श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, सोमवार पेठ,बार्शी येथे “प्रजासत्ताक दिन ” साजरा करण्यात आला.
पियुष भारतभाऊ कोटेचा व सौ.प्रिती पियुष कोटेचा सहपत्तीनिक यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
या वेळी श्री जैनाश्रमचे ट्रस्टी व सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते. श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ.सेक्रेटरी, आनंद पुनमिया, सदस्य धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, रूपेश कांकरिया, अशोक कांकरिया , प्रमोद भंडारी हे सर्व उपस्थित होते.
सुत्रसंचालन आनंद पुनमिया यांनी केले. व आभार धिरज कुंकूलोळ यांनी मानले.
या कार्यक्रमात लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून आले. त्या सर्व मुलांना श्री जैनाश्रमचे अध्यक्ष पारस कांकरिया यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या वेळी श्री जैनाश्रमचे ट्रस्टी भारत कोटेचा व प्रमुख पाहुणे यांचा सपत्निक मोत्याची माळ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.