June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

श्रीमान शिवाजीराव गुंड आदर्श‌‌‌ प्राथमिक विद्या मंदिर शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी

सोलापूर ;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी येथील श्रीमान शिवाजीराव गुंड आदर्श‌‌‌ प्राथमिक विद्या मंदिर शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, त्यांना विनम्र अभिवादन करुन,बालिका दिन,व महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला.यावेळी
आॅनलाईन द्वारे घेतलेल्या निबंध स्पर्धा व इतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
विजेत्या सुहाना सय्यद,सिफा शेख(ईयत्ता 6 वी),व रूपाली मोहिते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेषात येऊन ओवी गायन केले.यावेळी शिक्षक, शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मोहिते,चव्हाण आदी उपस्थित होते.आभार मुख्याध्यापिका सत्यभामा चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply