October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांचा सत्कार

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार  जयंत आसगांवकर यांचा सत्कार केला. या स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. वर्षाताई ठोंबरे उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव
यु.वी. बेणे यांनी संस्थेच्या वतीने सत्कार केला.
स्वागत समारंभाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन मान्यवराच्या हस्ते करुन झाली. यावेळी नूतन शिक्षक आमदार जयंत आगावकर म्हणाले “आमदारकीचा सहा वर्षाचा हा कार्यकाळ शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्या शासन दरबारी प्रलंबित असणा-या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी खर्ची घालणार आहे. झाडबुके परिवाराने केलेला हा सत्कार मी कायम स्मरणात ठेविन, मला निवडून आणण्यामध्ये आपण सर्वांचे मोलाचे योगदान आहे.”.
स्वागत समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या संचलिका सौ. वर्षाताई ठोंबरे म्हणल्या
आ. आसगावकर हे शिक्षक, संस्थाचालक व आमदार असल्याने त्यांना शिक्षणक्षेत्रातील सर्व प्रश्नांची
जाणिव आहे त्यामुळे विविधि प्रश्नांची यथायोग्य सोडवणूक करतील”.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन झाडबुके यांनी केले. बाबासाहेब पाटील यांचे स्वागत हनमुंत जाधवर यांनी केले.  सुभाष पाटील यांचे स्वागत बार्शी टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक विक्रम टकले यांनी केले.आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.एस. पाटील यांनी मानले यावेळी बार्शी
शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखोपशाखांचे सर्व शिक्षक बंधु भगिनी, प्राध्यापक बंधु तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू
मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अनिल बेळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची
सांगता झाली.

Leave a Reply