March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

श्रीमती छाया भानुदास साखरे यांना राज्यस्तरीय “आय टी गोल्डन ग्लोब अवॉर्ड” ने सन्मानित

मुंबई ;-
महानगरपालिका येथील संगीत शिक्षिका आणि शास्त्रीय गायिका, बॉलिवूड प्ले बॅक सिंगर ,अभिनेत्री ,समाजसेविका अशा सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीम. छाया भानुदास साखरे यांना “इंटरनॅशनल टॅलेंट मुंबई” या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा समजला जाणारा “आय टी गोल्डन ग्लोब अवॉर्ड – 2021”
25 मार्च रोजी सेव्हन स्टार द ललित हॉटेल एअरपोर्ट रोड मुंबई येथे डॉ. श्री संदीप सिंग (मधुमेह तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते), प्रो .डॉ. श्री . दिनेश गुप्ता , डॉ अनिता गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement

श्रीम. छाया भानुदास साखरे या मूळच्या लातूर येथील रहिवासी असून गेल्या 20 वर्ष पासून कलेची साधना व सेवा करीत आहेत. सामाजिक क्षेत्रात संगीत शिक्षक , कलाकार म्हणून त्यांची प्रभावी छाप आहे. विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी त्यांनी आज पर्यंत असंख्य व प्रगतिशील उपक्रम राबविले आहेत.
या कार्यामुळे त्यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यात मुंबईचा ,आदर्श संगीत शिक्षिका पुरस्कार (मुंबई शहरात एकमेव महिला )महापौर पुरस्कार 2018, गुजरात गिरनार संगीत रत्न पुरस्कार , Empowering women of india नॅशनल पुरस्कार , सावित्रीबाई फुले आदर्श संगीत पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, संगीत कलारत्न पुरस्कार, इत्यादी पुरस्कार प्राप्त आहेत.

आजपर्यंत श्रीम. छाया साखरे यांनी ,अनेक टीव्ही शो मध्ये ,झी युवा मराठी, सह्याद्री ,ई . टीव्ही मुंबई, आकाशवाणी इ मध्ये कार्यक्रम केले आहेत .शिवाय विद्यार्थ्यांना सुध्दा संधी दिली आहे. मिट्टी के सितारे ( रियालिटी शो ) , डान्स महाराष्ट्र डान्स (रियालिटी शो) इ सहभाग आहेत.
छाया साखरे ह्या सर्वांना अगदी हवं हवं स व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या नवनवीन उपक्रमातुन नेहमीच मुलांना चालना मिळत असते . त्यामुळे पालकवर्गाची व विद्यार्थ्यांची जाणुन घेण्याची कला त्याच्याकडे आहे. तसेच आपल्या क्षेत्रात ते अतिशय मेहनत घेत असतात. छाया साखरे ह्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व आहेत.

साखरे मॅडम यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल समाजात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.साखरे मॅडम ह्या उत्कृष्ट शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी तीन हिंदी चित्रपट मध्ये प्लेबॅक दिले आहे. त्याच प्रमाणे त्यांचे अनेक भजन अलबम सुद्धा मार्केट मध्ये प्रसिध्द आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्रीमती छाया साखरे यांना त्यांचे गुरुजन शास्त्रीय गायिका पद्मभूषण श्रीमती डॉ .प्रभा अत्रेजी आणि पद्मश्री श्री अनुप जलोटा यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले. तसेच औरंगाबाद चे समाजसेवक मा . सुमित पंडित यांनी देखील अभिनंदन केले आहे.

तसेच कौटुंबिक सदस्य , मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

श्रीम. छाया साखरे यांनी या वेळेस पुरस्कार चे श्रेय स्वतः एकट्याचे नसून माझे कुटुंब , परिवार , आणि सर्व विद्यार्थी यांचे आहे असे सांगितले.

Leave a Reply