November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

श्रीपतपिंपरी फाट्यावर किसान सभेचा रस्ता रोको

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

अखिल भारतीय किसान सभा बार्शी शाखेच्या वतीने तिन काळे कृषी कायदे रद्द करा, शेतकर्‍यांवर होत असलेली दडपशाही थांबली पाहिजे या मुख्य मागण्यासह इतर मागण्या घेऊन  कुर्डवाडी रत्यावरील श्रीपतपिंपरी फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला.  हा रस्तारोको काॅ. तानाजी ठोंबरे व काॅ. लक्ष्मण घाडगे  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला

यावेळी कॉमेड तानाजी ठोंबरे म्हणाले, “लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांचा लढा पुढे जाईल व मोदी भाजप आणि आरएसएस ला वठणीवर आनूूनच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडेल.”  यावेळी कॉम्रेड लक्ष्मण घाडगे यांचेही भाषणे झाले.

अंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, पैगंबर मुलाणी, काॅम्रेड बाळासाहेब जगदाळे, बाळराजे पाटील, शाहूराज घाडगे, धनाजी पिंगळे, सुभाष पिंगळे, तानाजी काकडे, पोपट घाडगे, अनिल कोळी, शिवाजी घाडगे, शिवाजी काकडे, प्रकाश ताकभाते, सूटाचे प्रा. रानो कदम, प्रा. डाॅ. राजन गोरे, सौ. लता यादव आयटक संलग्न डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघाचे काॅ. लहू आगलावे, काॅ. भारत पवार, काॅ. धनाजी पवार, किसान मूळे, काॅम्रेड प्रविण मस्तुद, अनिल शिंदे, अनिल सावंत, आनंद गुरव, कादर पठाण, विजय खुणे, ग्रामपंचायत संघटनेचे काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, बाळासाहेब चांदणे, सतिश गायकवाड, सुरेश कुंभार, मुबारक मुलाणी, संजय ओहळ, आतूल पर्बत काॅ. अनिरूध्द नखाते, शौकत शेख, बालाजी शितोळे, भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण, नवाज मुलांनी, आमले, जगदाळे आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेषनचे काॅ. पवन आहिरे, सुयश शितोळे, आदि उपस्थित होते.

Leave a Reply