June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेळीपालनासाठी लाख रूपये आणण्यावरूण नवविवाहितेचा छळ करूण केले आत्महत्येस प्रवृत्त,मोहोळ तालुक्यातील सहा जनावर बार्शी गुन्हा दाखल

बार्शी ;

शेळीपालन करण्यासाठी माहेरहुन एक लाख रूपये घेऊन ये या कारणावरून नवविवाहितेचा जाच, छळ करूण तिला  विषारी औषध पिवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील लक्षाचीवाडी येथे घडला.याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील सहा जनावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#सोनाली विलास वसेकर वय 27 वर्षे रा सिकंदर टाकळी ता मोहोळ सध्या रा लक्ष्याचीवाडी ता बार्शी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

#विलास शंभाजी वसेकर (पती), संभाजी दत्तु वसेकर (सासरा),पदमीनी संभाजी
वसेकर (सासु)नणंद ( नाव माहीत नाही), संतोष संभाजी वसेकर (दिर),आश्विनी संतोष वसेकर सर्व रा
सिकंदर टाकळी ता मोहोळ अशी जाचहाट करूण आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

#वैशाली बाबासाहेब ढगे वय 38 वर्षे,  रा.लक्ष्याचीवाडी, ता.बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीची बहिन सोनाली विलास वसेकर वय 27 वर्षे रा सिकंदर टाकळी ता मोहोळ सध्या रा लक्ष्याचीवाडी ता बार्शी हिचे लग्न झाले नंतर 08 ते 10 दिवसांनी ते
दि.27/02/2021 चे दरम्यान वेळो वेळी आधुन मधुन सिकंदर टाकळी येथे सासरी व माहेरी लक्याचीवाडी
येथे सासरच्या लोकांनी तिला तुझ्या माहेरकडुन शेळी पालनासाठी एक लाख रुपये घेवुन ये असे
म्हणुन तिला मारहाण करुन उपाशी ठेवणे,चटके देणे,तु माहेरी चांगली वागली नाही.
म्हणुन तिचा शारिरिक व मानसिक छळ केला म्हणुन तिने
बंगल्याच्या वरच्या बाजुस टेरिस वर स्वः त विषारी औषध पिवुन आत्महत्या केली.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळावर जाचहाट करूण आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply