June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेळगाव(आर) सरपंचपदी प्रभावती बादगुडे तर उपसरपंच पदी शाहू कचरे यांची बिनविरोध निवड

बार्शी ;
बार्शी तालुक्यातील शेळगाव(आर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रभावती विजय बादगुडे  तर उपसरपंच पदी शाहू अप्पासाहेब कचरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
20 वर्षानंतर सत्तांतर झालेल्या  ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुकी मध्ये शेळगावआर येथे सुरेश अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलनने  11पैकी 6 उमेदवार  निवडून आणून सत्तापरिवर्तन करून सत्तास्थापन  केली
   मंगल नागणे ,शोभा देडे,   राजाभाऊ  गायकवाड , नानासाहेब  सपाटे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विजय बादगुडे, बाळासाहेब  गायकवाड , प्रकाश
गायकवाड शिवाजी जाधव सचिन बादगुडे  भानुदास नागणे रवींद्र सपाटे आदी उपस्थित होते.
   निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शंकर पाथवटे व ग्रामसेवक गोपाल सुरवसे यांनी काम पाहिले.
पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे   श्रीकांत बादगुडे,   आण्णा गिलबिले, तात्या सिरसट , कादर तांबोळी   आदी उपस्थित होते.

Leave a Reply