March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेतक-यांसाठी महत्वाची बातमी, आता शेती नुकसानीची माहिती द्या कागदपत्राशिवाय

नसरापूर (पुणे) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी भारत सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना वापरास सोपे असे मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपव्दारे पीक नुकसानीची माहिती नोंदवण्यास प्राधान्य देण्यात आले असून नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागू नये, तसेच कागदपत्रांची गरज भासू नये, सुलभ पद्धतीने नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे जाऊन त्यावर त्वरीत कार्यवाही व्हावी, यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

Leave a Reply