March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेतकऱ्यांनी व्यापारक्षम शेती करावी- नगराध्यक्ष तांबोळी ,महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा अंतर्गत संत सावतामाळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे उदघाटन .

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा अंतर्गत संत सावतामाळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे उदघाटन बार्शी येथे नगराध्यक्ष मा.असिफ तांबोळी यांचे हस्ते जगदाळे मामा हॉस्पिटल समोर संपन्न झाले त्यावेळी शेतकऱ्यांनी आता बाजाराभिमुख उत्पन्न घेऊन थेट विक्री करावी असे मत ऍड.असिफ तांबोळी यांनी व्यक्त केले.
    शेतक-याने गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वतः उत्पादित केलेला माल स्वतः विकल्यास नफा जास्त मिळेल हा उद्देश ठेवून आत्मा अंतर्गत  स्थापित जे शेतकरी गट स्वतः थेट विक्री करतात आशा गटांना संत सावतामाळी रयत बाजार अभियानातून छत्री वाटप करण्यात आले, या प्रसंगी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नगरसेवक श्री भारत पवार,नगरसेवक श्री विजय चव्हाण सर, नगरसेवक श्री बारंगुळे, तालुका कृषी अधिकारी श्री शहाजी कदम,  कृषी अधिकारी श्री दिलीप राऊत, श्री जगदाळे, श्री नानासाहेब लांडगे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कल्पक चाटी,श्री बगाडे तसेच सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक  व तालुक्यातून उपस्थित शेतकरी गट प्रतिनिधी , शेतकरी उपस्थित होते.
  या प्रसंगी नगराध्य यांनी स्वतः भाजी खरेदी केली, तसेच अश्या प्रकारे उपक्रमाद्वारे  विक्री चांगली होऊन आम्हाला नक्की फायदा होईल असे शेतकरी म्हणाले, या प्रसंगी 1 तासात जवळपास 1300 रुपयांची उलाढाल ही झाली.

Leave a Reply