October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब नुकसान भरपाई जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरू…शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड

सोलापूर;- महाराष्ट्र स्पीड न्युज
     अतिवृष्टीची नुकसान भरपाई व सन २०१७-१८चा राहीलेला दुष्काळ निधी ताबडतोब शेतकऱ्यांच्या खातेवर जमा करा, राज्यातील प्रथम श्रेणी वर्गातील अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची न्यायालयीन चौकशी करा, राज्यातील ज्या साखर कारखाण्यांनी व्याजासह एफ.आर.पी.अधिक नफा अशी ऊस बीले न दिलेल्या संचालक मंडळावर गुन्हे नोंदवून त्यांच्या संपत्तीचा लिलाव करून शेतकऱ्यांची देणी द्या.आदी मागण्यांचे निवेदन बार्शीचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले त्यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड, शरद भालेकर, अमर पाटील, रामराव काटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
       शेतकऱ्यांचे सततच्या आसमानी व सुलतानी संकटामुळे कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडले असल्याचे सांगुन नुकसान अतिवृष्टी भरपाई व मागील राहीलेला दुष्काळ निधी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या खातेवर जमा नाही केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाची आंदोलने करणार असल्याचा इशाराही यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिला.

Advertisement

Leave a Reply