December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरी देण्यात यावी…..    प्रार्थना फाऊंडेशनची खा. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..      शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे  आश्वासन…..

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
     हजारो शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत आहेत.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांचे आज प्रचंड हाल होत आहेत.त्यांचेकडे पाहणार त्यांच दुःख समजून घेणार कोणीच उरल नाही.आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आले,मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे,महिलांना विधवा पेन्शन सुरू नाही,आज त्या कुटुंबांना रहायला पक्क घर नाही,शेतीसाठी कर्ज भेटत नाही, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या या विविध समस्या व मागण्या आहेत.
    शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरी मध्ये समाविष्ट करून घेण्यात याव ही आमची प्रमुख मागणी आहे जेणेकरून या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा मिटेल.या आधी ही सरकारकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना नोकरी देण्याचे वेळोवेळी फक्त आश्वासन दिले गेले पण त्यावर पुढे कोणतीच कारवाई होताना दिसली नाही……
     खाजदार साहेबांकडे गेल्यावड त्यांनी या सर्व प्रकरणी सकारात्मक भूमिका दर्शविली. आज तागायत सोलापूर मधील सर्वच लोकप्रतिनिधींना तसेच जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भातील निवेदन दिली आहेत.
    शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली हे ऐकून सर्वजनच हळहळ व्यक्त करतात पण आता वेळ आली आहे ती त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची होणारी फडफड थांबवण्याची,त्यांच्या सोबत उभा राहण्याची……
      शेतकऱ्याने आत्महत्या केली का इथल्या नाकर्ते व्यवस्थेने त्याचा खून केला हा वेगळा विषय….
     पण शेतकऱ्यांना कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर तुटपुंजी आर्थिक मदत केली की सरकारची जबाबदारी संपली अस त्यांना वाटत पण खरी जबाबदारी तिथून सुरू होते….
      शेतकऱ्याने गळफास घेऊन,रोगरच औषध पिऊन स्वतःची जीवनयात्रा संपवल्यावर एक सरकार म्हणून,एक नागरिक म्हणून एक नातेवाईक म्हणून आपण किती आपुलकीने त्या कुटुंबाची जबाबदारी….जबाबदारी तर सोडाच पण नुसती आपुलकीने चौकशी करतो.आपण सर्वजणच त्यांची जबाबदारी अगदी सोयीस्कर पने नाकारतो.
      पण आता खरी गरज आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत आपण खंबीरपणे उभा राहण्याची,त्यांना खचून जाऊन नका आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देण्याची.
       सरकारने वारंवार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना सरकारी नोकरीमध्ये समाविष्ठ करून घेण्याची घोषणा केली,आश्वासन दिली पण त्याच नंतर काहीच झालं नाही कारण त्यांच्या मागण्यांसाठी लढणार कोणीच नाही.ते आज ही त्याच हाल अपेष्टा सहन करत आयुष्य जगत आहे.नवऱ्याच्या कर्जाच्या डोंगरखाली घरातील स्त्री दबली जात आहे,ती हिमतीने उभा राहण्याचा प्रयत्न करतेय पण तीच शोषण होत आहे,तिला हीन वागणूक दिली जातेय.कित्तेक महिलांना स्वतःच्या हिमतीवर कर्ज फेडल आणि स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत.कित्येक महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत, छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छितात पण त्यांना कोणी सहकार्य करत नाही.
     बँकेत गेल्यावर कर्ज भेटत नाही,नातेवाईकाच्या कडे गवल्यावर इज्जत मिळग नाही,विधवा पेन्शन साठी तहसील कार्यालयात गेल्यावर पिळवणूक होते लाच दिल्याशिवाय काम होत नाही,आहे ती तुटपुंजी शेती करायला कर्ज मिळत नाही,शासकीय योजनेतून शेततळ,विहीर भेटत नाही,घरात नळ नाही,लाईट नाही,मुलांना शिक्षण नाही,मुलीचं लग्न नाही त्यात आजारपण वेगळं,रहायला पक्क घर नाही,घरत गॅस नाही या अगदी छोट्या छोट्या जगायला लागणाऱ्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्यात समाजात मिळणारी वागणूक वेगळी.
    ज्या शेतकऱ्यांना कर्जला कंटाळून आत्महत्या केली आहे त्या शेतकऱ्यांच्या वारसाला आश्वासन दिल्या प्रमाणे शासकीय नोकरीत सामावून घेतल तर त्याच्या कुटुंबाला नक्की उभारी मिळेले.आज तागायत वारंवार आमदार खाजदार, कलेक्टर यांच्याकडे या मागण्यांचा पाठपुरावा करत आलो आहे पण कोणत्याच गोष्टींचे उत्तर नाही.
     जर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब उभारी यावं अस वाटत असेल तर त्याच्या कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेतल्याशिवाय पर्याय नाही.

Advertisement

Leave a Reply