June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिष्यवृत्ती परीक्षेत मित्र विद्यालयाचे घवघवीत यश-

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता आठवी) परीक्षेत मळेगाव ता बार्शी येथील कर्मवीर ना.मा.गडसिंग (गुरुजी)मित्र विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता 8 शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमेश नलवडे राज्यात 9 वा, जिल्ह्यात 3 रा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती धारक झाला आहे.कु प्रज्ञा प्रताप गडसिंग हिने जिल्ह्यात 175 वा क्रमांक मिळवला आहे.तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता 5 वी) परीक्षेत कु.साक्षी वायकर बार्शी तालुक्यात 15 वी, कु.प्रांजली बुद्रुक तालुक्यात 41 वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती धारक झाल्या आहेत.गुणवंत  विद्यार्थ्यांना प्राचार्य विकास बोराडे,हेमांगी मिरगणे,गौस शेख,रमाकांत डोळसे,विकास ढेंगळे,विकास राऊत, शेख,केदार यांचे मार्गदर्शन मिळाले.याअगोदर देखील विविध परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत मित्र विद्यालयाने उज्ज्वल व दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिसाळ व्ही.बी,सचिवा सखुबाई गडसिंग,खजिनदार ज्ञानदेव आगलावे,सहसचिव हेमंत गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक विलास मिरगणे, प्राचार्य विकास बोराडे,पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गव्हाणे,सर्व संचालक मंडळासह,विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी
गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply