March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिराळे ग्रामपंचायत सरपंचपदी निर्मला अंकुशे तर उपसरपंच पदी दत्तात्रय सुरवसे बिनविरोध


बार्शी ;
शिराळे ता.बार्शी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  सौ. निर्मला बाळासाहेब अकुंशे तर उपसरपंच पदी दत्तात्रय  सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुक निर्माण अधिकारी ए.यु.तोडकरी व ग्रामसेवक मंगेश जगदाळे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

Advertisement

यावेळी नुतन ग्रामपंचायत पदाधिकारी भास्कर साहेबराव चौधरी, सौ. संगीता संजय चौधरी, नाना माधव चौधरी, सौ. नंदा दत्तू गायकवाड,  सौ. कमल दादा गवळी, किसन जंगलू ओव्हाळ ,सौ. शोभा नेताजी चंदनशिवे   उपस्थित होते.            
शिराळे ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आ.दिलीप सोपल गटाचे चार सदस्य विजयी झाले आहेत तर आ.राजेंद्र राऊत गटाकडे ना.मा.प्र महिला उमेदवार नसल्याने सरपंचपदी विरोधी सोपल गटाच्या उमेदवारास संधी मिळाली आहे.उपसरपंचपदी आ.राऊत गटाचे सुरवसे बिनविरोध आले आहेत.

Leave a Reply