June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिराळेत दोघांकडून एकास मारहाण

बार्शी ;

दोघांनी मिळून एकाला शिविगाळ करीत विनाकारण काठीने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील शिराळे येथे घडला.

@संतोष सिदु चौधरी व भैय्या उर्फ आश्रुबा येडबा चौधरी दोघेही रा.शिराळे अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#लक्ष्मण उर्फ गणेश दत्तात्रय आगलावे वय 25 वर्षे,  रा शिराळे ता बार्शी याने याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सांयकाळी 07.30 वाचे सुमारास शेतातील ज्वारीची काढणी करुन घरी आला. त्यावेळी संतोष सिदु चौधरी याने त्यास फोन करुन शाळेचे मागे ये म्हणुन सांगीतले तेथुन ते हाॅटेलवर गेले व दोघांनी मिळून दारू घेतली.
त्यावेळी  सोबत भैया उर्फ आश्रुबा येडबा चौधरी हा देखील होता तो आगोदरच दारु पिलेला होता. दारु पिल्या नंतर  मोटर सायकलवर वाघाचीवाडी रस्त्यावर तळ्याजवळ गाडी थांबवुन खाली उतरवले व संतोष चौधरी याने पाठीमागुन काठीने त्यास मानेवर मारले त्यामुळे माझ्या गळयाजवळ जखम झाली आहे.व भैय्या उर्फ आश्रुबा येडबा चौधरी याने शिविगाळी व दमदाटी केली आहे.
याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply