शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीची बैठक संपन्न

बार्शी;
शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे महाविद्यालय स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ. गुणवंत सरवदे हे उपस्थित होते, तसेच राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय समन्वक डॉ रवींद्र चाटी हेही उपस्थित होते. ही बैठक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ एस एस गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . सदर बैठकीत महावि्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एस. डिसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून जून 2020 ते 31जानेवारी 2021 पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून राबवीण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचा तपशील सादर केला. महाविद्यायातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अद्ययावत करण्याबाबत चर्चा करण्यात आली, तसेच भविष्यात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या समाजाभिमुख, ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण खेडी, जलसाक्षरता इत्यादी उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गुणवंत सरवदे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी विविध समाजोयोगी उपक्रम आणि अभियाने यशस्वीपणे राबविण्यासाठी कृतीआराखडा सादर केला. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीची सांगता व उपस्थितांचे आभार व्यक्त करून झाली . बैठकीस सर्व समिती सदस्य उपस्थित होते.