March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा


बार्शी महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

  आंतर राष्ट्रीय कीर्तीचे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन ऑनलाईन साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गौरव भंडारी उपस्थित होते.प्राचार्य डॉ एस एस गोरे व रोटरी क्लब बार्शीचे अध्यक्ष मधुकर डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  बी एड विभाग प्रमुख डॉ भिलेगावकर यांनी गौरव भंडारी यांचा परिचय व उपस्थितांचे स्वागत केले.गौरव भंडारी यांनी बी एड प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत गणितातील ट्रिकस सोप्या उदाहरणातून स्पष्ट केल्या .गणिताचे महत्व सांगत गणित सोपे कसे हे सांगताना पुस्तकातील ट्रिकस पेक्षा सोप्या व सुटसुटीत संकल्पना मांडल्या. वर्षातील दिवस, जन्म दिनांक, वार यावर आधारित उदाहरणे स्पष्ट केली. कमी वेळात अचूक गणित सोडवण्यासाठी सरांच्या ट्रिकस सोप्या आहेत असा प्रतिसाद प्रशिक्षणार्थींना दिला . कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनशी चर्चा करून व उपस्थितांचे आभार व्यक्त करून झाली . कार्यक्रमास बी एड प्रशिक्षणार्थी ,प्राचार्य डॉ एस एस गोरे, डॉ भिलेगावकर ,
रो डोईफोडे  तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते

Leave a Reply