June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ऑनलाईन सराव अध्यापन व  छात्रसेवाकाल संपन्न

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालय ०१ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत बी एड  द्वितीय वर्ष सत्र तिसरे अंतर्गत  ऑनलाईन सराव अध्यापन व छात्रसेवाकाल  शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये बंद आहेत मात्र ऑनलाईन शिक्षण  प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बी एड प्रशिक्षणार्थींचे सराव पाठ अध्यापन प्रात्यक्षिक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले.  प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी छात्रसेवाकाल शिबिराचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी सराव अध्यापन व छात्रसेवाकाल संकल्पना व  कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेतला. विद्यापीठाच्या निर्देशानुसार  या प्रात्यक्षिक अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने सराव पाठ आयोजन व कार्यवाही अभिरूप पद्धतीने करण्यात आली.  या प्रात्यक्षिक अंतर्गत बी एड प्रशिक्षणार्थींचे एकूण सहा गट करण्यात आले. प्रत्येक गटास एक मार्गदर्शक प्राध्यापक नियुक्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आशययुक्त अध्यापन व आय सी टी आधारित अध्यापन असे अध्यापन पद्धतीनिहाय एकूण ०८ सराव पाठ प्रत्येक प्रशिक्षणार्थींनी  ऑनलाईन पद्धतीने सादर केले.  यात पीपीटी, व्हिडिओ व ऑडिओ क्लिप, इमेजेस,  आदीद्वारे सराव पाठ घेतले. ऑनलाईन आंतरक्रिया  प्रभावीरित्या करून प्रशिक्षणार्थींनी नाविन्यपूर्ण सराव पाठ घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे बी एड प्रशिक्षणार्थींना तंत्रज्ञान आधारीत सराव पाठ घेण्याचे कौशल्य विकसित करता आले. बी एड प्रशिक्षणार्थींनी शालेय आशय यावर आधारित दृक श्राव्य साधनांद्वारे ऑनलाईन अध्यापन केले.
या छात्रसेवाकाल शिबिरामध्ये बी एड प्रशिक्षणार्थीनी सराव पाठ टाचण, आशय सराव अध्यापन, पाठ निरीक्षण, ई-शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर अशी विविध प्रकारची प्रात्यक्षिके पूर्ण केली.  तसेच ऑनलाईन पद्धतीने छात्रसेवाकाल प्रात्यक्षिक बाबत बी एड प्रशिक्षणार्थींचे प्रत्याभरण व यशस्वीता याबाबत माहिती घेतली. सदर छात्रसेवाकाल उपक्रमात प्राचार्य डॉ एस एस गोरे, समन्वयक डॉ एम व्ही मते व डॉ पी ए पाटील, डॉ एस डी भिलेगावकर, डॉ व्ही पी शिखरे, डॉ एम एस डिसले व  डॉ आर ए फुरडे तसेच बी एड प्रशिक्षणार्थीं यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply