October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिक्षकांना सुट्टी नाहीच ! शाळा बंद, तरीही ऑनलाईनसाठी शाळेत येणे बंधंनकारक

सोलापूर :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहर- जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. तर या काळात शाळा बंद राहतील, असेही आदेश दिले. मात्र, शासनाच्या निर्बंधानुसार प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावा या हेतूने शिक्षकांनी शाळेत येऊन ऑनलाइन अध्यापन करणे क्रमप्राप्त आहे, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी  स्पष्ट केले.
      शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा सुट्ट्यांचा आनंद घेता येईल आणि घरी बसून विद्यार्थ्यांना शिकविता येईल, असे अनेक शिक्षकांना अनेकांना वाटले. मात्र, शिक्षकांना त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
       पुढील वर्षी संचमान्यता होणार असून विद्यार्थी संख्या कमी झालेल्या शाळांमधील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्‍त होतील, अशी भितीही वर्तविली जात आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांना अध्यापन करुन त्यांच्यातील शिक्षणाची गोडी कायम ठेवावी लागणार आहे.
         दरम्यान, प्राथमिक विभाग चे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले, शालेय शिक्षण विभागाकडून दर आठवड्याला स्वाध्याय संच दिला जातो. त्यातील 10 प्रश्‍नांची उत्तरे विद्यार्थ्यांना सोडविता येणे क्रमप्राप्त आहे. काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती यु-डायसला जोडली जाणार असून त्याठिकाणी प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती पाहता येणार आहे. त्यामुळे सर्व शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडेदेखील लक्ष द्यावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही, प्रत्येक शाळांमधील 50 टक्‍के शिक्षकांनी दररोज शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल. इ.9 वी व 10 वी च्या सेवकसंचनुसार चे शिक्षकांनी रोज शाळेत येणे आवश्यक आहे.इतर शिक्षकांनी 50% प्रमाणे उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणाले, घरी बसून ऑनलाइन शिकविणे अभिप्रेत नसून शाळांमधील शिक्षकांनी शाळेत येऊनच विद्यार्थ्यांना फलकासह ऑनलाइन शिक्षण द्यावे लागेल.तसे कार्य अहवाल ही संबंधीतींकडून घ्यावेत.पुढील आदेशान्वये ग.शि.अ. कडे द्यावेत.
      आदेशाचे नियमान्वये पालन व्हावे. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल.
          माध्य.शिक्षणाधिकारी,सोलापूर.

Advertisement

Leave a Reply