October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वैश्विक सत्य मांडणारे कवी कुसुमाग्रज:प्रा प्रमिला देशमुख

कवी कालिदास मंडळाच्या वतीने साहित्यिकांचा सन्मान

बार्शी:
कवी कालिदास मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून साहित्यात बहुमोल असे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक,कवी पं. ना.कुलकर्णी व प्रख्यात कवयित्री प्रा प्रमिला देशमुख यांना साहित्यसेवेबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोलताना प्रमिला देशमुख यांनी मराठी साहित्याची थोरवी मांडली. माणसाच्या मनामध्ये काय दडलंय ते दाखवून द्यायची प्रगल्भ हातोटी कुसुमाग्रज यांच्याकडे होती .वैश्विक सत्य मांडणारी त्यांची लेखनशैली होती असे गौरवोद्गार त्यांनी काढले .ज्ञानेश्वरी केवळ घरात असून उपयोग नाही तर ती मना मनात उतरायला हवी तेंव्हाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल असे मत मांडतानाच त्यांनी सई बाईंचा निरोप,देश मऱ्हाटी आगळा व ज्याचे जळे त्याला कळे या स्वरचित कविताही सादर केल्या. दुसरे सत्कारमूर्ती शिक्षणतज्ज्ञ, लेखक पं ना कुलकर्णी यांनी जीवनातील अमृतक्षणांचे संदर्भ देत सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा डॉ रविराज फुरडे यांनी केले सत्कारमूर्ती विषयी मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी,प्रकाश गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले .गंगाधर अहिरे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.यावेळी शब्बीर मुलाणी,प्राचार्य माणिक देशमुख,आबासाहेब घावटे प्रा सविता देशमुख आदि उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयसिंग राजपूत, सुमन चंद्रशेखर, प्रा अशोक वाघमारे, चन्नबसवेश्वर ढवण आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply